सुरेश लोखंडेमुरबाड : निवडणुकीतील उमेदवारांची पार्श्वभूमी माहीत असल्यामुळे त्यांना पसंती आहे. ते आपल्याच घरचे आहेत. परंतु, पक्षाच्या ध्येयधोरणांच्या अंमलबजावणीपुढे त्यांना काहीही करता येत नाही. स्थानिक गरजेच्या विकासकामांसह रेल्वेमार्ग अन् धरणांची रखडलेली प्रकल्पातील गुंतागुंत सोडवण्याऐवजी त्यात अधिक वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. त्यातच केंद्रासह राज्यातील सत्तेवर असलेल्या पक्षाकडून मुस्कटदाबी होत असल्याचा आरोप करून करून मुरबाडचे मतदार लवचीक धोरण असलेल्या अन् जनहित जपणा-या उमेदवारांची चाचपणी करत असल्याचे चित्र तालुक्यात फेरफटका मारल्यावर दिसून आले.जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचाराला आता वेग आला आहे.सध्या सत्तेवर असलेले राजकीय पक्ष त्यांच्या सोयीनुसार ठिकठिकाणी अंमलबजावणी करून घेत आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधीला ते मुकाट्याने करावे लागत आहे. त्यांच्यासह नागरिकांचीदेखील मुस्कटदाबी झाली आहे. त्यांना बोलता येत नाही, असे भीतीचे वातावरण तयार झाले आहे. या घरबसल्या ओढवून घेतलेल्या संकटातून मुक्त होण्यासाठी सोयीच्या पक्षाचा शोध मतदार घेत आहे.बारवी धरणाखाली जमीन बुडालेल्या शेतकºयांना सुमारे १९८४ पासून आजतागायत न्याय मिळालेला नाही. त्यातील गुंता सैल करण्याऐवजी तो वाढवत ठेवला आहे. काळू धरणाला कोणत्या प्रकारची मान्यता नसतानाही बनावट ड्रॉइगशीटच्या आधारावर धरणाच्या कामास प्रारंभ केला. न्यायालयाने हा भ्रष्टाचार उघड केला. मनमानी व बिनबोभाटपणे होत असलेला काळू प्रकल्प मुरबाडकरांच्या माथी मारण्याचा प्रयत्न न्यायालयाने हाणून पाडला. शाई धरणाच्या विरोधातील शेतकºयांचा अद्यापही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. पर्यायी धरणांचा अद्यापही विचार करण्यात आला नाही, हे मुद्दे यावेळी जाणवले.
विकास प्रकल्पात सत्ताधाºयांकडून मुस्कटदाबी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2017 12:35 AM