शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
2
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
3
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
4
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
5
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
6
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
8
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
9
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
10
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
11
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
12
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
13
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
14
लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
15
राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी, आतून काढली दोन पोस्टर्स अन् म्हणाले...
16
विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष
17
Maharashtra Election 2024 Live Updates: मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी अजित पवार गटाचा मोठा निर्णय, खेळी फिरणार?
18
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
19
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
20
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा

‘त्या’ महाठगाचा प्रकृती अस्वास्थ्याचा बनाव उघड!

By admin | Published: April 05, 2017 5:33 AM

पोलिसांच्या चौकशीपासून वाचण्यासाठी महाठगाने केलेला प्रकृती अस्वास्थ्याचा बनाव अखेर उघडकीस आला.

ठाणे : पोलिसांच्या चौकशीपासून वाचण्यासाठी महाठगाने केलेला प्रकृती अस्वास्थ्याचा बनाव अखेर उघडकीस आला. व्यापाऱ्यांना सुमारे दीड कोटी रुपयांनी फसविणाऱ्या या ठगाची न्यायालयाच्या आदेशानुसार वैद्यकीय तपासणी केल्यानंतर, मंगळवारी त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.वाशी येथील निखिल अग्रवाल याच्यासह तिघांविरुद्ध शीळ डायघर पोलीस ठाण्यात ११ जानेवारी रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मध्य प्रदेशातील व्यापारी संदीप गोयल यांचे जवळपास ७७ लाख रुपयांचे कडधान्य त्याने परस्पर विकल्याचा आरोप त्याच्यावर आहे. पोलिसांनी अग्रवालला अटक केल्यानंतर, ठाणे न्यायालयाने त्याला ३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. परंतु, २ एप्रिलला त्याने प्रकृती अस्वास्थ्याचा बनाव केल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार त्याला ठाण्याच्या शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. तक्रारदार गोयल यांनी यावर आक्षेप नोंदविणारी याचिका ३ एप्रिलला ठाणे न्यायालयात दाखल केली. अ‍ॅड. रमेश त्रिपाठी यांनी त्यांची बाजू मांडताना या प्रकरणी गंभीर आरोप केले. व्यापाऱ्यांचा विश्वास संपादन करून त्यानंतर अग्रवाल त्यांची फसवणूक करीत असे. त्याच्याविरूद्ध डायघर, एपीएमसी मार्केट, तळोजा पोलीस ठाण्यासह मध्य प्रदेशात फसवणुकीचे चार गुन्हे दाखल असल्याची माहिती त्यांनी न्यायालयास दिली. वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी अग्रवालला भरती करून घेण्यास नकार दिला होता. परंतु, आरोपी बळजबरी रुग्णालयात भरती झाला असून, रुग्णालयाच्या दफ्तरी तशी नोंद असल्याचे अ‍ॅड. त्रिपाठी यांनी निदर्शनास आणून दिले. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसरा केलेल्या वैद्यकीय तपासणीअंती अग्रवालचा प्रकृती अस्वास्थ्याचा बनाव उघडकीस आला. (प्रतिनिधी)>न्यायालयात पडला तोंडघशीफसवणुकीच्या गुन्ह्यात निखिल अग्रवालला ३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. व्यापाऱ्यांना सुमारे दीड कोटीचा गंडा घालणाऱ्या या महाठगाकडून फसवणुकीची रक्कम वसूल करण्यासाठी त्याची पोलीस चौकशी होणे क्रमप्राप्त होते. परंतु, प्रकृती अस्वास्थ्याचा बनाव करून पोलीस चौकशी टाळण्यात तो यशस्वी झाला. त्याचा हा बनाव न्यायालयासमोर उघड झाला खरा, परंतु पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर. त्यामुळे न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. आरोपी न्यायालयात तोंडघशी पडला असला तरी पोलीस चौकशीचा फास सोडविण्यात तो यशस्वी झाला. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरातमधील व्यापाऱ्यांना ठगविणाऱ्या या आरोपीची पुन्हा वैद्यकीय तपासणी करण्याची त्यांची मागणी न्यायालयाने मान्य केली. त्यानुसार आरोपीची वैद्यकीय तपासणी केली असता तो ‘फिट’ असल्याचे आढळले. वैद्यकीय अहवालानंतर मंगळवारी न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. अदखलपात्र गुन्हा दाखलतक्रार मागे घेण्यासाठी निखिल अग्रवाल धमक्या देत असल्याची तक्रार संदीप गोयल यांनी ठाणेनगर पोलिसांकडे दिली आहे. त्यानुसार निखिल अग्रवालविरुद्ध अदखलपात्र गुन्हा मंगळवारी नोंदविण्यात आला.