कल्याण : केडीएमसी हद्दीतील अनमोल वृक्षसंपदेची ओळख वनस्पती व निसर्गप्रेमींना व्हावी, त्यांच्याबाबत अधिकाधिक रुची वाढावी तसेच या वृक्षसंपदेची नोंदणी करण्यासाठी केडीएमसी व न्यास ट्रस्ट यांच्यातर्फे २६ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरदरम्यान कल्याण-डोंबिवली ग्रीन रेस स्पर्धा घेण्यात येत आहे.
भोपर, कोपर, खोणी, निळजे, रेतीबंदर खाडी, एनआरसी, बारावे परिसर आदी निसर्गरम्य ठिकाणी मुबलक प्रमाणात वनस्पती आणि पक्षी यांचे चांगले वैविध्य आहे. ही जैवविविधता जतन करण्यासाठी तसेच या निसर्ग संपत्तीबाबत जनजागृती निर्माण होण्यासाठी आणि माणूस व निसर्ग यांना जवळ आणण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात येत आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी २६ ऑगस्टपर्यंत https://forms.gle/zHC2tuR5eKQ5dUQ87 या लिंकवर अर्ज उपलब्ध आहे. या स्पर्धेत मनपा हद्दीतील नागरिक सहभागी होऊ शकतात. त्यासाठी कोणतीही अट नसून, स्पर्धेतील सहभाग हा तीन ते पाच जणांच्या गटाने घ्यावयाचा आहे. स्पर्धकांनी मनपा परिसरातील वनस्पतींची पाहणी करून त्याची नोंद एका लॉग बुकमध्ये करावयाची आहे. विजेत्यांना मनपातर्फे प्रशस्तिपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क गायत्री ओक - ९३७२११७५६२ व संकेत माईनकर – ९०२९३०६८६५.
----------------------