ठाणे : पर्यावरण जनजागृतीचा संदेश देण्यासाठी ठाण्यात ग्रीन थिएटर फेस्टिवल रंगणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, इको फॉक्स आणि स्वराज्य इव्हेंट्सयांच्या संयुक्त विद्यमाने हे पर्यावरणावर आधारित फेस्टिवल आयोजित केले आहे.
या फेस्टिवल अंतर्गत ठाणे व मुंबई मधील आंतरशालेय लघुनाट्य स्पर्धा घेण्यात येणार आहे. स्पर्धेची प्राथमिक फेरी बुधवार ३० जानेवारी २०१९ रोजी ठाण्यात तर शुक्रवार १ फेब्रुवारी २०१९ रोजी अंतिम फेरी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहच्या मिनी थियेटर येथे होणार आहे. हि स्पर्धा ठाण्यातील विविध शाळांतील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली आहे. या स्पर्धेत विद्यार्थ्यांना क्लीन इंडिया ग्रीन इंडिया, नॉईस द न्यू पोल्युशन, से नो टू प्लास्टिक हे विषय देण्यात आले आहेत. प्रत्येक लघु नाटिका साधारण २० मिनिटांची असून १० ते १५ कलाकारांनी सादर करायची आहे. सर्वोत्कृष्ट लघु नाटिका प्रथम पारितोषिक रुपये २५,०००/-, द्वितीय- २०,०००/- आणि तृतीय १५,०००/- असून चषक आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहेत. याशिवाय सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, लेखक, अभिनेता, अभिनेत्री याना चषक रोख रक्कमव चषक हि पारितोषिके देण्यात येतील. पर्यावरण मित्र शाळा म्हणून तीन विशेष पारितोषिके देखील प्रदान करण्यात येणार असून पर्यावरण संवर्धनासाठी शाळेमार्फत शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मध्ये आयोजितकेलेल्या उपक्रमांची सविस्तर माहिती, विद्यार्थ्यांची संख्या, छायाचित्र/ प्रेझेंटेशनइत्यादी लघु नाटिकेच्या प्रार्थमिक फेरीच्या वेळी आयोजकांकडे जमा करायचे आहे.स्पर्धेत सहभागी होण्याकरिता मो. ८३५६९७०७७८ ह्या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.