ठाणे : कळवा परिसरात क्लस्टर डेव्हलपमेंट स्कीम अर्थात समूह विकास योजना राबविण्यासाठी शासनाने नुकतीच परवानगी दिली.त्यानंतर ही योजना प्रत्यक्ष राबविण्याच्या दृष्टीने नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी कळव्यात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या सभेला नागरिकांचा प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.स्थानिक नगरसेवक आणि ठाणे महापालिकेचे विरोधी पक्ष नेते मिलिंद पाटील,नगरसेवक मुकुंद केणी,प्रमिला केणी,अपर्णा साळवी यांच्या वतीने न्यू कळवा हायस्कुलच्या प्रांगणात या सभेचे आयोजन करण्यात आले होते. कळव्यात मागील काळात घडलेल्या काही इमारत दुर्घटना आणि त्यात झालेली जीवित व वित्त हानी यांचा उल्लेख करून या योजनेच्या मागणीमागील पार्श्ववभूमी मिलिंद पाटील यांनी आपल्या भाषणात नमूद केली.सर्व नागरिकांच्या सहभागातून आणि अत्यंत पारदर्शकपणे या योजनेच्या अंमलबजावणीसाठी पाऊले उचलली जातील असेही त्यांनी स्पष्ट केले.त्यानंतर या सभेसाठी खास उपस्थित असलेले नगरसेवक नजीब मुल्ला यांनी आपल्या भाषणातून या योजनेतील सर्व खाचाखोचा,बारकावे,त्यातील फायदे,संभाव्य अडचणी आदी अनेक बाबतीत सविस्तर माहिती दिली.क्लस्टर डेव्हलपमेंट म्हणजे नेमके काय,हे समजून घेण्याच्या दृष्टीने त्यांचे मार्गदर्शन अतिशय महत्वपूर्ण ठरले. त्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या योजनेच्या मंजुरीसाठी केलेला सगळा संघर्ष आणि आता दृष्टीपथात आलेली अंमलबजावणी याबद्दल भाष्य केलं. संपूर्ण कळवा परिसराचा चेहरामोहरा या योजनेच्या अमलबजावणीतून बदलला जाणार असून हे एक सर्वांगसुंदर शहर बनवण्याचं माझं स्वप्न यातून नक्की पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.माजी खासदार आणि राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे,नगरसेविका प्रमिला केणी यांनीही याप्रसंगी समयोचित विचार व्यक्त केले.कळवा प्रभाग समिती अध्यक्ष महेश साळवी,नगरसेवक मुकूंद केणी,माजी नगरसेविका मनाली पाटील,विटावा येथील नगरसेवक जितेंद्र पाटील,आरती गायकवाड,रिपाई नेते पंढरीनाथ गायकवाड,परिवहन सदस्य तकी चेऊलकर,प्रकाश पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.सभेचे सूत्रसंचालन रवींद्र पोखरकर यांनी केले.
कळवा परिसरात आयोजित समूह विकास योजना - सभेला कळवेकरांचा उदंड प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 4:14 PM
कळव्यात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या सभेला नागरिकांचा प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
ठळक मुद्देनागरिकांशी थेट संवाद सभेला नागरिकांचा प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसादकळवा परिसराचा चेहरामोहरा बदलला जाणार - जितेंद्र आव्हाड