शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
2
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
3
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
4
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
5
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
6
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
7
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
8
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
10
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
11
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
12
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
13
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
14
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
16
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
17
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
18
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
19
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
20
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र

पुजाऱ्याचे महिलेसोबत गैरवर्तन; महिलांकडून पुजाऱ्याला बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2018 10:00 PM

गैरवर्तन करणाऱ्या पुजाऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात

कल्याण: महिलेशी गैरवर्तन करणाऱ्या पुजाऱ्याला संतप्त महिलांनी चोप दिल्याची घटना कल्याणमधील सूचननाका येथील गणपती मंदिराच्या घडली आहे. गोपाळ तांबे असं या गैरवर्तन करणाऱ्या पुजाऱ्याचं नाव आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी पुजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. सूचकनाक्यावरील गणपती मंदिरात गोपाळ तांबे पुजारी म्हणून काम करतो. त्याला त्याठिकाणी बाबा असं संबोधलं जातं. म्हारळ येथे राहणारी एक महिला मानसिक आजारानं त्रस्त होती. तिला कोणीतरी तांबे बाबांकडे जाण्यास सांगितलं. त्यामुळे महिला तिच्या पतीसह गणपती मंदिरात गेली होती. त्यावेळी बाबानं महिलेच्या पतीला बाजारातून फळ घेऊन येण्याची सूचना केली. फळ देवाच्या चरणाजवळ ठेवल्यानं तुझ्या पत्नीला बरं वाटेल, असं तांबेनं सांगितलं. यानंतर महिलेचा पती बाजारात सफरचंद घेण्यासाठी गेला. पती बाजारात गेल्यानंतर महिला मंदिरात एकटीच होती. यावेळी बाबानं आजारी महिलेला बरं करण्याच्या बहाण्यानं तिच्या अंगावरुन हात फिरवला. हा प्रकार पाहून धास्तावलेल्या महिलेनं मंदिराबाहेर धाव घेतली. तितक्यात महिलेचा पती मंदिराजवळ आला. यानंतर महिलेनं झालेला सर्व प्रकार पतीला सांगितला. या घटनेची माहिती मिळताच काही महिलांनी मंदिरात घुसून पुजाऱ्याला जबर मारहाण केली. पुजाऱ्याच्या धाटक्या मुलीलादेखील महिलांनी चोप दिला. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पुजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.  

टॅग्स :Womenमहिलाkalyanकल्याण