शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
2
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
3
“नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है”; शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
4
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
5
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
6
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
7
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
8
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
9
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
10
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
11
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
12
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
13
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
14
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
15
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
16
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
17
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
18
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
19
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
20
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”

चिंचणीच्या समुद्रकिनाऱ्यावर वाढतेय पर्यटकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 11:43 PM

सुटीच्या दिवशी येतात हजारो नागरिक : चिंतेत भर

लोकमत न्यूज नेटवर्कडहाणू : निसर्गसौंदर्याने नटलेल्या चिंचणीच्या स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनाऱ्यावर कोरोना महामारीच्या काळातदेखील शनिवार तसेच रविवार या सुट्टीच्या दिवशी हजारो पर्यटकांची गर्दी वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. डहाणू तालुक्यातील चिंचणी, वाढवण, वरोर, गुंगवाडा, घाकटी डहाणू, डहाणू, चिखले, आगर, नरपड, बोर्डीपर्यंतच्या हिरवाईने नटलेल्या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांबरोबरच आबालवृद्ध महिला, मुले आणि कुटुंबेच्या कुटुंबे फेरफटका मारण्यासाठी येत असतात. त्यामुळे हे स्वच्छ सुंदर समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजून गेले आहेत. विशेष म्हणजे चिंचणीच्या समुद्रकिनाऱ्यावर शनिवार आणि रविवार या दोन शासकीय सुट्टीच्या दिवशी पालघर, बोईसर, वानगाव, चारोटी, कासा तसेच परिसरातील हजारो लोक मौजमजा करताना दिसत असतात.

चिंचणीच्या समुद्रकिनाऱ्यावर चारचाकी वाहनांना बंदी असतानाही काही तरुण हौशी मंडळी धूम स्टाईलने वाहने चालवीत असतात. तसेच काही मंडळी टिंगलटवाळी आणि स्टंटबाजी करण्यासाठी चारचाकी गाड्या घेऊन समुद्रकिनाऱ्यावर फिरत असल्याचे दिसून येते. अनेक वेळा चिंचणीच्या समुद्रकिनारी अपघातदेखील झाले आहेत. तर अनेक वेळा चारचाकी वाहने समुद्रात वाहून वाळूत रुतून पडल्याच्या घटना घडलेल्या असताना केवळ स्टंटबाजीसाठी अनेकजण समुद्रकिनारी वाहने नेतात. महिनाभरापूर्वी चिंचणी ग्रामपंचायतीने समुद्रकिनाऱ्यावर वाहनांना बंदी घातली होती. परंतु थोड्या दिवसांनी पुन्हा वाहने किनाऱ्यावर फिरताना दिसत आहेत. एका बाजूला शासन गर्दी टाळण्याचे आवाहन करताना दुसरीकडे समुद्रकिनाऱ्यांवर होणारी गर्दी चिंता वाढवणारी आहे. 

टॅग्स :thaneठाणे