ठाणे : खुसखुशीत, खमंग फराळाशिवाय दिवाळी ही संकल्पना पूर्णच होऊ शकत नाही. पण यंदा हा फराळ महागला आहे. त्याला जेवढी अन्नधान्यातील महागाई कारणीभूत आहे, त्याहीपेक्षा अधिक जीएसटीची झळ पोहोचली आहे. त्यामुळे फराळाच्या दरात साधारणत: २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.केंद्र सरकारने जीएसटी कौन्सिलच्या बैठकीनंतर काही दरांत सवलती दिल्या, त्यात गुजरातमधील खाकºयाचा समावेश होता, पण महाराष्ट्रातील दिवाळी फराळाचा केंद्राला विसर पडला आणि महाराष्ट्रालाही. त्यामुळे महिलांचे बचतगट, गृहउद्योगांतील व्यक्तींनी याबाबत नाराजी व्यक्त केली. अर्थात फराळाशिवाय दिवाळी साजरी न करणाºया ठाणेकरांची महाग होत गेलेल्या रेडीमेड फराळाला मागणी कायम आहे.बसुबारस सोमवारी असल्याने सध्या घरोघरी दिवाळीच्या खमंग फराळाची तयारी सुरू आहे. पण नोकरदार महिला, ज्येष्ठ नागरिक, अमराठी भाषक, व्यावसायिक अशा वेगवेगळ््या घटकांकडून रेडीमेड फराळाला चांगली मागणी असते. हा फराळ परदेशीही पाठवला जातो. वाढत्या मागणीमुळे महिला बचत गट, गृहउद्योग, उपाहारगृहे यांच्याकडून फराळाच्या सुरूवातीच्या आॅर्डर बाजारातही आल्या. फराळाचा दरवळणारा खमंग वास अनुभवायाला मिळतो आहे.घरी फराळ तयार करण्याची प्रमाण कमी होऊ लागल्याने त्या प्रमाणात रेडीमेड फराळाची बाजारपेठ वाढते आहे. याचा चांगला परिणाम फराळाच्या आॅर्डरवर होऊ लागला आहे. फराळात नवनविन प्रयोग होत असले तरी पारंपरिक फराळाला मागणी कायम आहे, असे व्यावसायिक संजय पुराणिक यांनी सांगितले.ओल्या नारळाच्या व सुक्या खोबºयाच्या करंज्या, भाजणीची चकली, साजूक तुपातले अनारसे, चिरोटे, कडबोळी, भाजक्या पोह्याचा आणि पातळ पोह्यांचा चिवडा, गोड्या व खाºया शंकरपाळ््या, बेसनाचे लाडू, रवा लाडू, मोतीचूर लाडू, घरगुती तिखट व साधी शेव असे अनेक पदार्थ त्यांच्या वैशिष्ट्यांसह बाजारात उपलब्ध होऊ लागले आहेत. गेल्या आठ दिवसांपासून फराळाच्या कामाचा वेग वाढला आहे. त्यामुळे कामगारांच्या संख्येतही वाढ केल्याचे पुराणिक म्हणाले.सोशल मीडियावर आॅर्डर्स-दिवाळीच्या फराळाची आॅर्डर घेण्यासाठी बदलत्या काळानुसार व्हॉट्सअॅप, फेसबुक अशा सोशल मीडियाचाही आधार घेतला जात आहे. फेसबुकवर आम्ही दर दिले होते आणि आॅर्डर व्हॉट्सॅपवर घेतल्या गेल्या, असा दाखला पुराणिक यांनी दिला.फराळाची परदेशवारी : गेल्या काही वर्षांपासून ठाण्याच्या खमंग फराळाला परदेशात मागणी वाढत आहे. सुका फराळ दीर्घकाळ टिकत असल्याने याच फराळाला जास्त मागणी असते. सध्या अमेरिका, ब्रिटन, दुबईला ठाण्यातील फराळ जातो. यात चकली, चिवडा, चिरोटे, कडबोळी यांना परदेशातील भारतीयांकडून जास्त मागणी आहे, असे वरुण पुराणिक यांनी सांगितले.‘दिवाळी पहाट’साठी बुकिंगदिवाळी पहाट आयोजित करणारे बहुतांश आयोजक हे कार्यक्रमसाठी येणाºया रसिकांना फराळाचे वाटप करतात. त्यांनीही मोठ्या प्रमाणात आॅर्डर दिल्या आहेत.डाएट फराळ :महिलांच्या बचतगटांकडे पूर्वी फक्त डाएट चिवड्याची आॅर्डर येत असे. पण आता कमी तेलातील किंवा बेक केलेल्या चकल्या, करंज्या यांचाही समावेश असतो. लाडू किंवाकंरजीत साखर न घालता शुगर फ्री पदार्थांचा वापर करण्याचा ट्रेंड आहे. खास मधुमेहींसाठी अशा आॅर्डर मिळतात. पण या मालाचा पुरवठा मागणीनुसार होतो.कंपन्यांतही फराळअनेक कंपन्या, कारखान्यांत किंवा कॉर्पोरेट आॅफिसात दिवाळीतील एका दिवशी एकत्र फराळ करण्याचा ट्रेंड वाढतो आहे. त्यासाठी त्यांच्याकडूनही आॅर्डर येतात. पण त्यांना प्रत्येक व्यक्तीनुसार थोडा चिवडा, दोन करंज्या, तीन-चार चकल्या, वेगवेगळे दोन लाडू, थोडी शंकरपाळी, थोडी शेव, साखर भुरभुरवलेले चिरोटे अशी पॅकेट किंवा बॉक्स हवे असतात. त्यामुळे तशा पॅकिंगचीही सोय करून दिली जाते, असे गृहउद्योग करणाºया महिलांनी सांगितले.
जीएसटीच्या टक्केवारीने कुरतडला खमंग, खुसखुशीत फराळ ; खाकरा स्वस्त करणा-या केंद्र सरकारवर बचत गट, गृहउद्योगांची आगपाखड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 2:08 AM