शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

शालेय साहित्य खरेदीला जीएसटीची ‘शिक्षा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2018 3:03 AM

कच्च्या मालाच्या दरातील वाढीमुळे दरवर्षी शालेय साहित्य महाग होते हे गृहीत धरले जात असले, तरी यंदाच्या त्या महागाईला जीएसटीचीही फोडणी बसली आहे. गणवेश, दप्तरे, बूट, वॉटरबॅग, वह्या अशा साऱ्या साहित्यावर पाच ते १८ टक्के जीएसटी आकारला जात असल्याने पालकांना एकप्रकारे दुहेरी शिक्षा भोगावी लागते आहे.

ठाणे/डोंबिवली : कच्च्या मालाच्या दरातील वाढीमुळे दरवर्षी शालेय साहित्य महाग होते हे गृहीत धरले जात असले, तरी यंदाच्या त्या महागाईला जीएसटीचीही फोडणी बसली आहे. गणवेश, दप्तरे, बूट, वॉटरबॅग, वह्या अशा साऱ्या साहित्यावर पाच ते १८ टक्के जीएसटी आकारला जात असल्याने पालकांना एकप्रकारे दुहेरी शिक्षा भोगावी लागते आहे.येत्या आठ-दहा दिवसांत टप्प्याटप्प्याने सीबीएसई, आयसीएससी, एसएससी अशा वेगवेगळ््या बोर्डांच्या शाळा सुरू होत आहेत. एकीकडे वळवाने लावलेल्या हजेरीने पावसाळी वस्तुंची खरेदी आणि त्याचवेळी शाळा सुरू होत असल्याने त्यासाठीच्या साहित्याची खरेदी करण्यासाठी ठिकठिकाणच्या दुकानांत शनिवारपासूनच विद्यार्थी-पालकांची खच्चून गर्दी होत असल्याचे दृष्य पाहायला मिळते आहे.त्यातील कपड्यांवर पाच टक्के, दप्तरांवर १८ टक्के, बूटांवर आठ ते १८ टक्के, वॉटरबॅग, कंपासपेटी, पेन, पेन्सिल, टाय, बो, सॉक्स, वह्या, टोप्या, हेअरबॅण्ड यावर पाच, आठ, बारा, पंधरा, १८ टक्के असा दुकानांच्या दर्जानुसार वेगवेगळा जीएसटी आकारला जातो आहे.हे साहित्य नेमक्या कोणत्या कॅटेगरीत टाकायचे याबाबत संभ्रम असल्याचा गैरफायदा घेतला जात आहे. त्यात पालक भरडून निघत आहेत. गणवेशाच्या नावाखाली शाळांनी मुले एकजिनसी दिसावीत, त्यात देखणेपणा यावा, त्याला सुबकता यावी, रंगसंगतीची जोड मिळावी म्हणून केलेल्या प्रयोगांमुळे पालक मात्र मेटाकुटीला आलेआहेत.रेडिमेड गणवेशांचे प्रश्नविद्यार्थी-विद्यार्थिनींचे कपडे पूर्वी पालकांना शिवून घेण्याची सोय होती. पण गेल्या काही वर्षांत विशिष्ट पद्धतीच्या स्टिचिंगचा मुद्दा पुढे करून, शाळेच्या गणवेशाची विशिष्ट स्टाइल जपली जावी, असे सांगत फक्त रेडीमेड कपडेच दुकानांत उपलब्ध करण्यात आले आहेत. अनेकदा ते मापाला नीट बसत नाहीत. प्रसंगी अल्टर करावे लागले तर त्याचे फिटींग बिघडते. पण पालकांसमोर पर्याय नसतो. त्यातही काही ठिकाणी गणवेश शिवून घेण्याची सोय असली, तरी त्याची किंमत रेडीमेडपेक्षा दीडपट-दुप्पट अधिक होते. शिवाय रेडीमेड असो, की शिवून घेतलेले कपडे त्यात प्रसंगी गरजेनुसार ते सैल करण्यासाठी पुरेशी माया (शिवणीला जादा सोडलेले कापड) नसते. त्यामुळे पुन्हा नवा ड्रेस खरेदी करण्यावाचून पर्यायच उरत नाही.दुकानांची सक्ती : बहुतांश शाळांनी दुकानदारांशी संधान बांधले असून त्याच दुकानातून कपडे, दप्तरे, सॉक्स, टाय, बो, टोप्या खरेदीची सक्ती केली जात आहे. अन्य पर्यायच उपलब्ध असल्याने किंमतीत फेरफाराला, घासघीस करण्याला वाव उरलेला नाही. या मक्तेदारीत दुसºया दर्जाचे कपडे खरेदी करण्याचीही सोय नाही. त्यामुळे दुकानदाराने एखाद्या वस्तुला लावलेली किंमत आणि जीएसटी भरण्यावाचून पालकांपुढे पर्याय उरलेला नाही. पालकांवर वेगवेगळ््या दुकानांत फिरण्याची वेळ येऊ नये म्हणून ही सोय केल्याचा दावा काही शाळांनी केला आहे, तर काही शाळांनी एकरकमी कमिशनसाठी, उत्पन्नासाठी हा पर्याय निवडला आहे.जाकिटे, विविध ड्रेसची सक्तीबहुतांश शाळांत वर्गातील गणवेश, खेळण्याचे गणवेश, पोहोण्याचे गणवेश, सेमिनारसाठीचे गणवेश, ब्लेझर, जाकिटे असा साग्रसंगीत जामानिमा असतो. टोपीपासून बुटांपर्यंत प्रत्येक गोष्ट त्यात बदलते. ते कपडे सोबत नेण्याच्या बॅगाही ठरलेल्या असतात. दप्तरासोबत एखादी पिशवी नेऊन चालत नाही. त्यामुळे असे वेगवेगळे सेट खरेदी करावे लागतात. त्यानेही दुकाने खच्चून भरली आहेत.पावसाळी खरेदीतही शिस्तशाळा आणि पावसाळा यांची सुरूवात हातात हात घालून येते. अनेक शाळांत छत्री चालत नाही किंवा ती तीन घड्यांचीच असावी लागते. गणवेशाला ती मॅचिंग असावी लागते. तोच प्रकार रेनकोट किंवा विंडचिटरचा. त्यातही काही शाळांत पावसाळ््यापुरते गमबूट, सँडल किंवा टिटोज लागतात. सिझन बदलला की त्यात पुन्हा बदल केला जातो. त्यामुळे त्यानंतर नव्याने खरेदी करावी लागते. ऋतुमानानुसार गणवेशात होणाºया बदलातील शिस्तीचाही फटका पालकांच्या खिशाला बसतो.

टॅग्स :thaneठाणेSchoolशाळा