ठाणे : रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची तक्रार ठाणेकरांना एका क्लिकवर करता यावी, यासाठी ठाणे महापालिकेने ‘स्टारग्रेड’ नावाचे अॅप सुरू केले आहे. तीन वर्षांपासून पालिकेचा हा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट रखडला होता. अखेर, त्याला मूर्त स्वरूप आले असताना केवळ पालकमंत्र्यांचा वेळ मिळत नसल्याने या अॅपचा मुहूर्त लांबणीवर पडला आहे. त्यामुळे ठाणेकरांवर खड्ड्यांच्या तक्रारी करण्यासाठी आता पालकमंत्र्यांच्या वेळेची वाट पाहावी लागण्याची नामुष्की ओढवली आहे. या अॅपमध्ये ठाणेकरांना खड्ड्यांविषयी तक्रारी करता येणार असून गुगल प्ले स्टोअरवर जाऊन स्टारग्रेड हे अॅप डाऊनलोड करावे लागणार आहे. त्यानंतर, शहरात एखाद्या ठिकाणी रस्त्यावर खड्डा पडल्याचे दिसल्यास त्याचा फोटो काढून तो सेंट करायचा आहे. त्यानुसार, आलेल्या तक्रारींवर खड्ड्याचे स्वरूप पाहून पुढील २४ अथवा ३६ तासांत कारवाई केली जाणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे. तसेच या अॅपमध्ये दुसऱ्या टप्प्यात ई-डायरीचा समावेश असून यामध्ये सर्व नगरसेवकांचे दूरध्वनी क्रमांक, पालिकेची वेबसाइट, नोट्स आदींची माहितीही मिळणार आहे. या अॅपचा शुभारंभ जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्याचे निश्चित झाले होते. परंतु, आता जुलै महिना संपत आला तरीसुद्धा त्यांच्याकडून वेळच मिळत नसल्याने या अॅपचा शुभारंभ लांबणीवर पडला आहे. परंतु, आता येत्या शनिवार अथवा रविवारी या अॅपचा शुभारंभ करण्याचा दावा पालिकेने केला आहे.गेल्या दोन वर्षांपासून मुंबई महापालिकेत खड्ड्यांची माहिती देणारे अॅप सुरू करण्यात आले आहे. या अॅपवर आलेल्या तक्र ारीतील खड्डाच बुजविण्यास प्राधान्य देण्यात आल्याने अनेक वेळा समस्या निर्माण झाली होती. त्यावरून मुंबईतील एका ज्येष्ठ नगरसेवकालाही एका अभियंत्याने थेट आव्हान दिल्याची चर्चा होती. या अॅपवर आलेल्या तक्र ारीच्या ठिकाणी एक खड्डा बुजविण्यात आला होता. त्याच खड्ड्याच्या बाजूला असलेला दुसरा खड्डा बुजविण्यात आला नव्हता. त्याचा जाब संबंधित अधिकाऱ्याला विचारण्यात आल्यानंतर अॅपवर दाखल झालेल्या तक्र ारीचाच खड्डा बुजविणार असल्याचे या अभियंत्याने सांगितले होते. तसेच संबंधित अधिकारी आपल्या मतावर शेवटपर्यंत ठाम राहिला होता. अशा वेळी भविष्यात ठाण्यात अशा प्रकारे अॅप सुरू झाल्यानंतर केवळ अॅपवरील खड्डे बुजविले गेल्यास इतर खड्ड्यांची जबाबदारी कोणावर देणार, असा प्रश्न आतापासमला याच आठवड्यात या अॅपच्या उद््घाटनासाठी विचारण्यात आलेले आहे. सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने माझ्या विभागाचे विशेष कामकाज नसलेल्या दिवशी मी येण्याचे कबूल केले होते. पण, त्याच सुमारास पुणे बायपासवर झालेल्या दुर्घटनेमुळे त्या ठिकाणी विशेष लक्ष केंद्रित करावे लागले आहे. अशा वेळी आपल्यासाठी या अॅपचे उद्घाटन खोळंबून ठेवू नये, असा संदेश आपण यापूर्वीच दिला आहे. मात्र, माझ्यामुळे जर या अॅपचे उद्घाटन रखडले असल्याचे सांगितले जात असेल तर या सुरक्षित अॅपचे उद्घाटन लवकरात लवकर करण्याचे आदेश आपण संबंधित यंत्रणेला देणार आहे. - एकनाथ शिंदे, पालकमंत्री, ठाणे जिल्हा(प्रतिनिधी)
खड्ड्यांच्या तक्रारीत पालकमंत्री ‘शुक्राचार्य’?
By admin | Published: July 24, 2015 3:31 AM