शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

Gudi Padwa 2018 : परंपरांची गुढी, आनंदाची तोरणे, स्वागतयात्रेने ठाणे शहर दुमदुमले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 3:32 AM

महिलांची बाईक रॅली, लेझीम पथकांचे सादरीकरण, ढोलताशांचा गजर, तुतारीचा निनाद, संबळवादन, बँड पथक, प्रथमच सोसायट्यांचा सहभाग, विविध वेशभूषा, मान्यवरांची मांदियाळी, तरुणाईचा उत्साह, ज्येष्ठांची उपस्थिती, सामाजिक संदेश देणारे चित्ररथ, रांगोळ््यांच्या पायघड्या आदींनी ठाणे शहरातील नववर्ष स्वागतयात्रा उत्साहात, जोशात पार पडली.

ठाणे : महिलांची बाईक रॅली, लेझीम पथकांचे सादरीकरण, ढोलताशांचा गजर, तुतारीचा निनाद, संबळवादन, बँड पथक, प्रथमच सोसायट्यांचा सहभाग, विविध वेशभूषा, मान्यवरांची मांदियाळी, तरुणाईचा उत्साह, ज्येष्ठांची उपस्थिती, सामाजिक संदेश देणारे चित्ररथ, रांगोळ््यांच्या पायघड्या आदींनी ठाणे शहरातील नववर्ष स्वागतयात्रा उत्साहात, जोशात पार पडली.श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित भारतीय नववर्ष स्वागतयात्रा पावणेसात वाजता मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून, पालखीचे पूजन करून सुरु झाली. सुरुवातीला पालखीचे भोई पालकमंत्री, शिवसेना नेते एकनाथ शिंदे झाले. त्यानंतर रंगोत्सव बापुजी गुप्ते चौक येथून स्वागतयात्रेस सुरुवात झाली. गेल्यावर्षी विष्णूनगर येथून स्वागतयात्रा नेण्यात आली होती. यंदा वर्षानुवर्षे परंपरा असलेल्या राजमार्गावरून पुन्हा स्वागतयात्रा काढण्यात आली. त्यामुळे ही स्वागतयात्रा गोखले रोड या मार्गाहून पुढे निघाली.गेल्या काही वर्षांपूर्वी ध्वनी आणि वायू प्रदूषण टाळण्यासाठी स्वागतयात्रेत फटाक्यांवर बंदी आणली होती. परंतु गोखले रोड येथील मध्यभागी मार्गावर शिवसेनेच्या वतीने व्यासपीठ उभारण्यात आले होते. पालकमंत्री व इतर राजकीय नेते या व्यासपीठाजवळ येताच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. त्यानंतर व्यासपीठावर जाऊन पालकमंत्री, महापौर व इतर राजकीय मंडळींनी पालखीवर पुष्पवृष्टी केली.पारंपारिक वेशभूषेत असलेली महिलांचा लक्षणीय सहभाग यंदाच्या स्वागतयात्रेचे आकर्षण ठरले. जवळपास ४५० महिला बाईक रॅलीत उत्स्फुर्तपणे सहभागी झाल्या होत्या. ‘सायकल चालवा, इंधन वाचवा’ असा संदेश देत काही महिला पारंपरिक वेशभूषेत सायकल रॅलीतदेखील सहभागी झाल्या होत्या. यंदा प्रथमच सोसायट्यांनी सहभाग घेतला होता. यात वर्धमान गार्डन सोसायटीचे २५ रहिवाशी टाळ, भजन घेऊन मराठी भक्तीगीते सादर करीत, ढोकाळी नाका येथील सोसायटीचे २५ रहिवाशी सायकलीला गुढी व भगवे झेंडे लावून तर लक्ष्मीनारायण सोसायटी रेसिडन्सी या सोसायटीचे तब्बल ८० रहिवाशी यात सहभागी झाले होते. कोणी लेझीम, कोणी झेंडा नृत्य सादर करीत होते, तर कोणी बाईक रॅलीत सहभागी झाले होते. डॉ. बेडेकर विद्यामंदिर शाळेच्या स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी सायकल यात्रा काढली होती तर काही विद्यार्र्थ्यांचे लेझीम पथक होते. ठाणे शिर्डी वारकरी प्रतिष्ठानचे सदस्य टाळ, ढोलकी घेऊन सहभागी झाले होते. झवेरी ठाणावाला कर्णबधीर विद्यामंदिर, विद्याभवन वसतीगृह, ठाणेचे विद्यार्थी, ब्रह्मकुमारी राजयोग सेवा केंद्र, ठाणे या संस्थेचे सदस्य स्वच्छ परिसरचा संदेश देत, काही कुटुंबदेखील आपल्या पाल्याला घेऊन सहभागी झाले होते. हिंदु जनजागृती समितीने लाठीकाठीचे सादरीकरण केले. सार्वजनिक शिवजयंती उत्सव भंडार आळी या संस्थेने बाजीराव पेशवे व त्यांचे ब्राह्मण यावर आधारित वेशभूषा केली. वनवासी कल्याण आश्रमाचा आदिवासी वाद्य व त्यांची माहिती देणारा चित्ररथ, मो. ह. विद्यालयाचा मल्लखांबाचा प्रात्यक्षिक दाखविणारा चित्ररथ होता. ठाणे महापालिकेचा सेव्ह वॉटर संदेश देणारा चित्ररथ स्वागतयात्रेतील मुख्य आकर्षण ठरला. यात आर. के. लक्ष्मण यांचा कॉमन मॅन हिरवळीत उभा असल्याचे दाखविण्यात आले होते.- संबंधित बातम्या २/३>चित्ररथांचे पुरस्कारचित्ररथामध्ये सरस्वती क्रीडा संकुल प्रथम, भगिनी निवेदिता उत्कर्ष मंडळ द्वितीय, पर्यावरण दक्षता मंडळाने तृतीय क्रमांक तर उत्तेजनार्थमध्ये प्रथम क्रमांक मो. ह. विद्यालयाचा मल्लखांब संच, मासेमारी दालदी मंडळाने द्वितीय क्रमांक पटकाविला. विशेष उल्लेखनीयमध्ये प्रथम पारितोषिक तेली समाज, द्वितीय पारितोषिक लक्ष्मी नारायण रेसिडन्सी तर तृतीय पारितोषिक स्वामी कृपा हौसिंग सोसायटीने पटकाविले.पुष्पवृष्टी न करताच पालखीचे प्रस्थानहरिनिवास सर्कल येथे पालखी आल्यावर मान्यवरांच्या हस्ते केजवरून पालखीवर पुष्पवृष्टी दरवर्षी केली जाते. सकाळी या ठिकाणी पालखी आली. अग्निशमन दलाच्या केजमध्ये पालकमंत्री शिंदे, महापौर शिंदे, खा. विचारे, आ. केळकर हे आतमध्ये गेले. काही क्षणातच पुष्पवृष्टीसाठी फुले अजूनही न आल्याचा निरोप आला आणि पुष्पवृष्टी न करताच पालखीचे पुढे प्रस्थान झाले आणि त्या केजमधून या मान्यवरांना खाली उतरावे लागले.पालकमंत्र्यांची कोपरखळी : गोखले रोड येथे आल्यावर यंदा ढोल ताशा पथक नाही का, असा सवाल पालकमंत्र्यांनी आयोजकांना केला. यावेळी आयोजकांनी कोणतेही उत्तर दिले नाही. त्यावेळी पुढच्यावर्षी ढोल ताशा पथकाचे कंत्राट संजय वाघुले यांना द्या, अशी कोपरखळी त्यांनी आयोजकांना मारली.