शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

ठाण्यात रंगणार गुरूवर्य स. वि. कुलकर्णी गौरव व्याख्यानमाला, यंदाचे व्याख्यानमालेचे रौप्य महोत्सवी वर्षे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 4:57 PM

सामाजिक उद्बोधन व प्रबोधन क्षेत्रासाठी वाहिलेली ही लोकाभिमुख व्याख्यानमाला ठाणेकर नागरिकांससाठी वैचारिक पर्वणी ठरते.

ठळक मुद्देठाण्यात रंगणार गुरूवर्य स. वि. कुलकर्णी गौरव व्याख्यानमालायंदाचे व्याख्यानमालेचे रौप्य महोत्सवी वर्षेव्याख्यानमालेत यंदा सुहास नाईक साटम आणि श्रीगौरी सावंत

ठाणे : सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे राष्ट्रीय सेवा योजना आयोजित गुरूवर्य स. वि. कुलकर्णी गौरव व्याख्यानमालेचे पुष्प यंदा ज्येष्ठ शास्त्रज्ञ सुहास नाईक साटम आणि तृतीयपंथी श्रीगौरी सावंत गुंफणार आहेत. येत्या शुक्रवार १३ डिसेंबर आणि शनिवार १४ डिसेंबर रोजी ही व्याख्यानमाला आयोजित केली आहे अशी माहिती आयोजन समितीचे सचिव प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.            सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे राष्ट्रीय सेवा योजना आयोजित गुरूवर्य स. वि. कुलकर्णी गौरव व्याख्यानमालेला यंदा २५ वे वर्षे पुर्ण होत आहे. सायं. ५. ३० वा. महाविद्यालयाच्या प्रांगणात ही व्याख्यान माला संपन्न होणार आहे. साटम हे चंद्रयान २ आणि श्रीगौरी सावंत या मला काही सांगायच आहे या विषयांवर बोलणार आहे. यात किन्नर म्हणून जगताना त्यांच्या आयुष्यात आलेले चढ उतार जनतेसमोर मांडणार आहेत. ही व्याख्यानमाला मुलाखतीच्या स्वरुपात असेल असे ढवळ यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक आणि ठाणे शहराचे महापौर नरेश म्हस्के यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच, व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी १३ डिसेंबर रोजी आदर्श शिक्षक पुरस्कारही प्रदान करण्यात येणार आहे. कै. सरलाताई चिटणीस यांच्या नावाने दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार पुर्व प्राथमिक विभागाला १ आणि प्राथमिक विभागाला एक, स्वातंत्र्यसेनानी दत्ताजी ताम्हाणे यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकाला एक आणि वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकाला एक तसेच, ज्ञानसाधना महाविद्यालयाच्यावतीने महाविद्यालयातील कनिष्ठ महाविद्यालयातील आणि वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकाला एक असे सहा पुरस्कार म्हस्के यांच्या हस्ते प्रदान केले जाणार आहे. या पत्रकार परिषदेला यावेळी महाविद्यालयाचे अध्यक्ष सतिश प्रधान, सचिव कमलेश प्रधान, खजिनदार सतिश सेठ, प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मराठे, अशोक चिटणीस उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcultureसांस्कृतिक