उल्हासनगर : नूतनीकरणाच्या नावाखाली नेताजी गार्डन खोदून दुरवस्था करणाऱ्या महापालिकेला राष्ट्रवादीने जाब विचारला आहे. एका आठवड्यात गार्डनबाबत निर्णय घेतला, नाहीतर पक्षातर्फे भीख मांगो आंदोलनाचा इशारा पक्षाचे गटनेते भरत गंगोत्री यांनी दिला. तसेच गार्डन नूतनीकरणाच्या नावाखाली शासन व पालिकेचा सहा कोटींचा निधी गेला कुठे, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
उल्हासनगर कॅम्प नं.-५ येथील नेताजी गार्डन नूतनीकरणाच्या नावाखाली चांगल्या अवस्थेतील गार्डन खोदण्यात आले. शेकडो महिला व नागरिक येथे बॅडमिंटन, कराटे, योगा व सकाळसंध्याकाळी चालण्यासाठी येतात. तसेच तीन वर्षांपूर्वीच गार्डनच्या नूतनीकरण व खुल्या व्यायाम साहित्यावर लाखो रुपये खर्च केला. एका वर्षापूर्वी नूतनीकरणाचे काम ठेकेदारामार्फत सुरू केले. चालण्याचा रस्ता रुंद करून इतर गार्डन खोदून ठेवण्यात आले. या प्रकाराबाबत संताप व्यक्त करण्यात येत असून अशा ठेकेदाराला काळ्या यादीत तर संबंधित अभियंत्याला निलंबित करण्याची मागणी करण्यात येत आहे. दुरवस्थेचा फटका सकाळसंध्याकाळ उद्यानात फेरफटका मारण्यासाठी येणाºया नागरिकांसह महिला व मुलांना बसत असून गार्डनच्या दुरुस्तीची मागणी राष्टÑवादीकडून केली आहे.महापालिका गार्डनच्या सुशोभीकरण व नूतनीकरणासाठी शासनाने ग्रीन पेसअंतर्गत साडेतीन कोटी तर पालिकेने तीन कोटींचा निधी मंजूर केला. नेताजी गार्डन, सपना गार्डन, लाललोई गार्डनसह इतर असंख्य उद्यानावर निधी खर्च करण्याऐवजी भररस्त्यावर उद्यान बांधून व गोल मैदानातील जागेवर छोटेखानी गार्डनवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला. नेताजी गार्डनचे अर्धवट काम ठेवून पळणाºया ठेकेदारासह संबंधित पालिका अभियंत्यावर कारवाईची मागणी होत आहे. नेताजी गार्डनचे अर्धवट पडलेले काम महापालिकेने एका आठवड्यात सुरू केले, नाहीतर गार्डनबाहेर पक्षातर्फे भीख मांगो आंदोलन करण्याचा इशारा गंगोत्री यांनी दिला. आंदोलनातून जमलेल्या निधीतून गार्डचे अर्धवट काम करण्याचे संकेतही त्यांनी दिले. तर, शहर अभियंता महेश शितलानी यांनी गार्डनचे काम अर्धवट टाकलेल्या ठेकेदारावर कारवाईचे संकेत देऊ न गार्डनचे काम करण्याचे संकेत दिले.चौकशी केल्यास घोटाळा उघड : गंगोत्रीशासनाने ग्रीन पेस व महापालिकेने एकूण सहा कोटींचा निधी गार्डनचे नूतनीकरण व सुशोभीकरणासह झाडे लावण्यासाठी मंजूर केले. गार्डनसह उद्यानाची दुरवस्था झाली असून व्हीनस चौकात भररस्त्यावर तर गोलमैदान येथे छोटेखानी उद्यान विकसित करून कोट्यवधींचा निधी खर्च केल्याचा आरोप गंगोत्री यांनी केला. सहा कोटींचा हिशेब पालिकेने नागरिकांना देण्याची मागणी गंगोत्री यांनी केली असून चौकशी झाल्यास मोठा घोटाळा बाहेर पडण्याची शक्यताही गंगोत्री यांनी व्यक्त केली.