शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

कळवा-ऐरोली एलिव्हेटेड मार्गात झोपड्यांचा अडथळा

By admin | Published: June 20, 2017 6:25 AM

ऐरोली-कळवा या नव्याने होणाऱ्या एलिव्हेटेड मार्गात आता अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. पूर्वीच्या मार्गात बदल करून तो

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ऐरोली-कळवा या नव्याने होणाऱ्या एलिव्हेटेड मार्गात आता अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. पूर्वीच्या मार्गात बदल करून तो मार्ग मफतलाल कंपनीच्या बाजूने पुढे न्यू शिवाजीनगर येथून जाणार आहे. त्यामुळे या भागात असलेल्या तब्बल ५५० झोपड्यांवर बुलडोझर फिरवला जाणार आहे. यामुळे पूर्वीच्या मार्गानेच एलिव्हेटेड न्यावा, अशी मागणी करून तेथील रहिवाशांनी रेल्वेमार्फत सुरू असलेल्या सर्व्हेक्षणाला विरोध केला आहे. आधी याच भागात पुनर्वसनाची हमी द्या, अन्यथा जीव गेला तरी झोपड्यांवर बुलडोझर फिरवू दिला जाणार नसल्याचा इशारा आता राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या नवीन मार्गाचे भूमिपूजन डिसेंबर २०१६ मध्ये होऊनसुद्धा अद्याप कामास सुरु वात झालेली नाही. नवीन मार्गासाठी मफतलाल कंपनीची अंदाजे ७१ गुंठे जागा रेल्वेला देण्याचे ठरले असून त्याच्या भूसंपादनासाठी रेल्वे व जिल्हाधिकाऱ्यांचा संयुक्त सर्व्हेदेखील करण्याची तयारी केली होती. परंतु, स्थानिकांच्या विरोधामुळे या कामाला अद्यापही मुहूर्त सापडलेला नाही. दरम्यान, एमयूटीपी-३ या तिसऱ्या टप्प्यातील कामात दिघा या नवीन रेल्वे स्थानाकाचाही समावेश असल्याने दिघा या नवीन रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारीत असलेली जागा मिळवण्यासाठी रेल्वेने प्रस्ताव एमआयडीसीला पाठवला असून ती जागा मिळाल्यास स्थानकाच्या कामास सुरु वात करता येणार आहे. दरम्यान, आता काही दिवसांपूर्वीदेखील या भागात सर्व्हे करण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु, येथील रहिवाशांनी तो होऊ दिलेला नाही. एमएमआरडीएमार्फत घरे दिली जाणार आहेत. परंतु, ती भांडुप अथवा मुंबईच्या इतर भागांत दिली जाणार असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. रहिवाशांचे या भागातील रेल्वे कॉलनी अथवा रेल्वेच्या इतरत्रच्या जागेत, परंतु येथेच पुनर्वसन करावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे स्थानिक नगरसेवक महेश साळवी यांनी केले आहे. पूर्वी एलिव्हेटेडचा मार्ग के.आर. स्टील कंपनीपासून पुढे जाणार होता. नंतर, पुन्हा तो बदलला. त्यानंतर, आता पुन्हा त्यात बदल केला आहे.