उल्हासनगर : महापालिका आयुक्त अजीज शेख यांच्या आक्रमक भूमिकेमुळे आझादनगर येथील ३ हजार स्वेअर फूट जागेवरील अवैध बांधकामावर गुरुवारी पाडकाम कारवाई केली. या कारवाईने भूमाफियांचे धाबे दणाणले असून सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी पाडकाम कारवाई सुरूच ठेवण्याचा इशारा दिला आहे.
उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामाविरुध्द कठोर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त अजीज शेख यांनी अतिक्रमण विभाग प्रमुख व प्रभाग अधिकारी यांनी दिले आहे. तसेच हिवाळी अधिवेशनामध्ये राज्यातील सर्वच महापालिका आयुक्तांना अवैध बांधकामावर कारवाईचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक अजीज शेख यांनी दिली. त्या अनुषंगाने २१ डिसेंबर रोजी आयुक्त अजित शेख यांनी अतिरिक्त आयुक्त, प्रभाग समिती अधिकारी यांची आढावा बैठक घेऊन शहरातील अनाधिकृत बांधकामाविरुध्द कठोर कारवाई करण्याचे आदेश सर्वचI सहायक आयुक्तांना दिले आहे. अनधिकृत बांधकामावर निष्कासन कारवाई तसेच सर्व प्रमुख रस्ते, चौक, पदपथ, अतिक्रमण मुक्त करण्याचे आदेश दिले आहे.
महापालिका प्रभाग समिती क्र-२, आझादनगर येथील शासकिय भुखंडावर बांधलेले सुमारे ३ चौरस फुटांच्या अवैध गाळ्यावर गुरुवारी पाडकाम कारवाई केली. अनधिकृत बांधकाम सुरु असल्याचे दिसून आले होते. शहरात होत असलेल्या अनाधिकृत बांधकामाविरुद्ध यापुढे कठोर कारवाई सुरु ठेवण्यात येणार असल्याची माहिती अतिक्रमण विभाग प्रमुख गणेश शिंपी यांनी दिली आहे.