ठाणे : कापूरबावडी जंक्शन ते बाळकुम रस्ता रु ंदीकरणांतर्गत बुधवारी कापूरबावडी नाक्यावरील महालक्ष्मी टॉवरमधील तीन इमारती पाडण्याचे काम सुरू झाले असून त्यातील तळ अधिक २ मजल्यांची एक इमारत संपूर्णत: पाडण्यात आली, तर उर्वरित २ तळ अधिक ४ मजली इमारती तोडण्याचे काम प्रगतीपथावर आहे.कापूरबावडी जंक्शन ते बाळकुमपाडा रु ंदीकरणांतर्गत बाधित बांधकामे यापूर्वीच पाडण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र, जंक्शनवरील तळ अधिक २ मजल्यांची १ इमारत तसेच तळ अधिक ४ मजल्यांच्या २ इमारती निष्कासित केल्या नव्हत्या. बुधवारी सकाळी ठामपा आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या ठिकाणी भेट देऊन या इमारती पाडण्याचे आदेश अतिक्र मण विभागाला दिले. त्यानुसार, अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली उपायुक्त (अतिक्र मण) अशोक बुरपल्ले, उपनगर अभियंता राजन खांडपेकर, कार्यकारी अभियंता रामदास शिंदे, सहायक आयुक्त मारु ती गायकवाड यांनी पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली.
त्या इमारतींवर हातोडा
By admin | Published: April 07, 2016 1:15 AM