डोंबिवली : पूर्वेतील रामनगरमधील केळकर रोडवरील जे.जे. म्हात्रे बिल्डिंग (वृंदावन बिल्डिंग) ही अतिधोकादायक इमारत पाडण्यास गुरुवारपासून सुरुवात करण्यात आली. ही कारवाई पुढील दोन दिवस चालणार आहे. दरम्यान, रेल्वेस्थानक परिसरात ही इमारत असल्याने खबरदारी म्हणून वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत.
जे.जे. म्हात्रे बिल्डिंगमध्ये इमारतीत १६ भाडेकरू व १२ व्यावसायिक गाळे होते. इमारतीमधील काही दुकाने सुरू होती, मात्र दुकान मालकांना नोटीस देऊन गाळे नुकतेच रिकामे करण्यात आले. इमारतीमधील भाडेकरू आणि गाळेधारकांना भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आले आहे. इमारत पाडण्याची कारवाई केडीएमसीचे अतिक्रमण निर्मूलन विभागाचे कर्मचारी, रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी व डोंबिवली वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी व एक ब्रेकरच्या यांच्या मदतीने सुरू करण्यात आली. ही कारवाई पुढील दोन दिवस सुरू राहणार आहे. मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार आणि विभागीय उपायुक्त पल्लवी भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ग’ प्रभाग क्षेत्र अधिकारी संदीप रोकडे यांनी ती कारवाई केली.
--------