- सदानंद नाईक
उल्हासनगर : वालधुनी नदी पात्रातून मंगळवारी रात्री साडे नऊ वाजता वडोलगाव व नदी किनारील परिसरात उग्र वास आल्याने, नागरिकांना श्वसनासह इतर त्रास होऊ लागला. स्थानिक नगरसेवकांसह समाजसेवक शिवाजी रगडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन, पोलीस व प्रदूषण मंडळाला माहिती दिली.
उल्हासनगरातून वाहणारी वालधुनी नदी गटारगंगा झाली असून नदी पत्रात केमिकल कंपन्या टाकाऊ विषारी द्रव सोडत आहे. मंगळवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या दरम्यान वडोलगाव परिसरात नदी पात्रातून उग्र वास आल्याने, नागरिक घरा बाहेर पडले. श्वसनसह इतर त्रास नागरिकांना होत असल्याने त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नगरसेवक गजानन शेळके यांच्यासह समाजसेवक शिवाजी रगडे, रामेश्वर गवई आदींनी घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांची समजूत काढली. प्रदूषण मंडळासह पोलिसांना माहिती दिली. बुधवारी सकाळी प्रदूषण मंडळाचे अधिकारी, पोलीस यांनी स्थानिकांच्या मदतीने नेहमी प्रमाणे नदी किनाऱ्याची पाहणी करून कारवाईचे आश्वासन दिले आहे.
गुजरात, पुणे आदी ठिकाणाहून आणलेले विषारी सांडपाणी टँकरद्वारे नदी पात्रात वेगवेगळ्या ठिकाणाहून सोडले जात असल्याचे बोलले जाते. नदी पात्रात पाणी कमी असल्याने सोडलेल्या विषारी द्रवाचा उग्र वास परिसरात येतो. उग्र वासाने श्वसनाच्या त्रासासह उलट्या, डोळे चुरचुरने, अंगाला खास सुटण्याचा प्रकार होत आहे. गेल्या महिन्यातही कैलास कॉलनी, भरतनगर, समतानागर आदि नदी किनारी परिसरात रात्रीच्या वेळी उग्र वास आल्याने, नागरिक भीती पोटी घराबाहेर पडले होते. त्यापूर्वी वडोलगाव, संजय गांधीनगर, सम्राट अशोकनगर आदी परिसरात अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. एकुणच वालधुनी नदी शहराला वरदान ठरण्या ऐवजी शाप ठरली आहे.
संच्युरी कंपनी रक्षकांनी पकडलेल्या टँकर मधील विषारी द्रव अतिघातक
गेल्या आठवड्यात संच्युरी कंपनीच्या सुरक्षा रक्षकांना कंपनी शेजारील नाल्यातून उग्र वास येत असल्याने, नाल्याची पाहणी केली. तेंव्हा शेजारी उभ्या असलेल्या टँकरमधून तसाच उग्र वास येत असल्याने, टँकर चालकाकडे सुरक्षा रक्षकांनीचौकशी केली असता, चालक पळून गेला. याबाबतची माहिती उल्हासनगर पोलीस, प्रदूषण मंडळ यांना देऊनही कारवाई झाली नोव्हती. अखेर संच्युरी कंपनीच्या रक्षकांनी तक्रार दिल्यावर टँकर ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. दरम्यान टँकर मधील टाकाऊ द्रव अतिघातक असल्याचा अहवाल उघड झाला आहे. शहराच्या मधोमध वाहणारी वालधुनी नदी