शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
2
Maharashtra Election: "आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा
3
देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती, मनसे महायुतीत येण्याचा सध्यातरी ‘स्कोप’ नाही
4
कसब्यात हिंदू महासंघाचा मनसे उमेदवाराला पाठिंबा; मतदारसंघात मतांचं गणित बदलणार?
5
जगभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी, न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंग दिव्यांनी उजळून निघाली
6
सरवणकरांचं कौतुक, राज ठाकरे, बाळा नांदगावकरांवर टीका; ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?
7
भाजपचे सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते भुलाई भाई यांचे निधन; वयाच्या 111 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल
9
मेगा लिलावाआधी प्रीतीच्या PBKS नं केली १०० कोटींपेक्षा अधिक बचत; कुणाच्या पर्समध्ये किती पैसा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
17
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
19
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

'हरित जिल्ह्यासाठी बंधारे ठरतील वरदान'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2020 11:43 PM

एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन : भादाणे बंधाऱ्याची केली पाहणी

ठाणे : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बांधण्यात येत असलेल्या वनराई बंधाºयामुळे जिल्हा हिरवागार होण्यास मदत होईल. या बंधाऱ्यांमध्ये पाणी उपलब्ध असल्याने शेतकºयांना दुबार पीक घेणे सहज शक्य झाल्याचे प्रतिपादन राज्याचे गृह, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुरबाड तालुक्यातील भादाणे गावातील काळू नदीवर बांधलेल्या विस्तीर्ण वनराई बंधाºयाची गुरुवारी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर ते बोलत होते.या काळू नदीवर बांधलेल्या या बंधाºयावर सगळ्यांनी जलप्रतिज्ञादेखील घेतली. त्याचबरोबर पवित्र असणाºया गंगा नदीचे जल शिंदे यांच्या हस्ते या बंधाºयात सोडण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपाली पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, उपाध्यक्ष सुभाष पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील, मुरबाड गटविकास अधिकारी विश्वनाथ केळकर यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य यावेळी उपस्थित होते.जिल्ह्यात १६०० बंधाºयांचे काम पूर्णशासनाचा एकही पैसा खर्च न करता जिल्ह्यात लोकसहभागातून वनराई बंधारे बांधले जात आहेत. आतापर्यंत एक हजार ६०० बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत. आपल्याला जास्तीतजास्त बंधारे बांधावयाचे आहेत. त्यासाठी लोकांची एकजूट महत्त्वाची आहे. लोकसहभागातून विकासाचे हे उत्तम उदाहरण असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.भादाणे बंधाºयामुळे रब्बी पिकांना फायदामुरबाड तालुक्यातील भादाणे येथील हा बंधारा १६ हजार ५०० गोण्यांनी तयार केलेला आहे. बंधाºयावर शेतकरी आजघडीला भाजीपाला लागवड करत आहे. तसेच बंधाºयाच्या जवळच वीटभट्टी सुरू केली आहे. त्यामुळे गावातील ३० ते ४० कुटुंबांचा उदरनिर्वाह होण्यास मदत झाल्याची बाब शिंदे यांच्या निदर्शनात मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांच्या संकल्पनेतून २ आॅक्टोबर रोजी बंधाºयाच्या मोहिमेला सुरुवात झाली होती. तेव्हापासून आजतागायत पाचही तालुक्यांत बंधारे बांधले जात आहेत. या बंधाºयांच्या पाण्यामुळे रब्बी हंगामातील पिके घेतली जात आहेत. तसेच जनावरांनादेखील हे पाणी उपयुक्त ठरत आहे.