भिवंडी :
दि.२५- देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हरघर जल,हरघर नळ योजनेमधून जलजीवन मिशन अंतर्गत भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागातील महिलांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबणार असून,या माध्यमातून महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्याचे मोठे कार्य होणार आहे अशी प्रतिक्रिया केंद्रीय पंचायतीराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी शनिवारी केले आहे.पाटील अंबाडी येथे अंबाडी व परिसरातील एकूण ४८ गावांमधील पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते.या कार्यक्रमाप्रसंगी आमदार शांताराम मोरे, जिल्हा परिषद माजी सदस्य देवेश पाटील,कैलास जाधव,किशोर जाधव,पंचायत समिती माजी सभापती रविना रवींद्र जाधव ,जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अर्जुन गोळे,यांसह अनेक मान्यवर ग्रामस्थ नागरीक उपस्थित होते.जलजीवन मिशन अंतर्गत राज्य व केंद्र सरकारच्या सहभागातून या योजना होत असून तालुक्यातील १९६ गावांच्या पाणीपुरवठा योजनेसाठी २२० कोटी रुपये मंजूर झाले आहेत.त्याचा फायदा संपूर्ण ग्रामीण भागाला होणार आहे.अंबाडी परिसरातील ४८ गावांच्या योजनांसाठी १४३ कोटी खर्च केले जात आहेत त्यांचा भूमिपूजन एकाच दिवशी करण्याचे भाग्य आम्हाला लाभले असे शेवटी कपिल पाटील यांनी स्पष्ट केले.जलजीवन मिशन अंतर्गत भिवंडी तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींच्या नळ पाणीपूरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या शुभहस्ते केवणी दिवे,कोपर,वडूनवघर,टेंभिवली, जूनांदुर्खी,कांबे,खोणी,कवाड,अनगाव,आवळे, अंबाडी,झिडके गावातील योजनांचा भूमिपूजन केवणी येथून सुरू झाला तो सायंकाळ पर्यंत सुरू होता.केवणी येथील शुभारंभ कार्यक्रमास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मनुज जिंदाल,जिल्हा परिषद सदस्या सपना भोईर यांसह मान्यवर उपस्थित होते.