शहरं
Join us  
Trending Stories
1
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
2
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी
3
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
4
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
5
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
6
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
7
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
8
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
9
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
10
Mumbai Rain: मुंबईच्या पूर्व उपनगरात तुफान पाऊस; भांडूप, मुलुंडमध्ये रस्त्याला आलं नदीचं रुप!
11
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
12
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
13
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
14
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
16
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
17
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

हसनैनला करायचा होता सुपारीचा व्यापार

By admin | Published: March 03, 2016 4:41 AM

हसनैन वरेकर याला सुपारीच्या व्यवसायाकरिता सुमारे ३५ लाखांची गरज होती. त्यासाठी त्याने कोपरखैरणे येथील मेहुणे शौकत खान यांच्याकडून सात लाखांचे कर्ज घेतले होते.

ठाणे : हसनैन वरेकर याला सुपारीच्या व्यवसायाकरिता सुमारे ३५ लाखांची गरज होती. त्यासाठी त्याने कोपरखैरणे येथील मेहुणे शौकत खान यांच्याकडून सात लाखांचे कर्ज घेतले होते. खासगी पेढीत सोने गहाण ठेवून ८७ हजारांचे कर्जही घेतले होते, अशी माहिती तपासात समोर आली आहे. त्यामुळे नोकरी गमावलेल्या हसनैन याला व्यवसायाकरिता पैशांची जुळवाजुळव करता न आल्याने त्याने नैराश्येतून हे हत्याकांड केले असावे का, ही शक्यता पोलीस तपासून पाहत आहेत.हसनैन वरेकर याने आपण नोकरी करीत असल्याचे घरी सांगितले असले तरी, प्रत्यक्षात त्याची नोकरी गेली होती. त्याच्या डोक्यात सुपारीचा व्यवसाय करण्याचा विचार सुरू होता. त्याकरिता डिसेंबर २०१४ मध्ये त्याने शौकत यांच्याकडून सात लाखांचे कर्ज घेतले होते. हा व्यवसाय करण्यासाठी परवाना मिळविणे, त्यानंतर मालाची आयात-निर्यात करणे, त्याचा साठा करणे, मालाची विक्री करणे, पैशांची वसुली करणे याकरिता त्याला तब्बल ३५ लाखांची गरज होती. त्यातील सात लाख ८७ हजारांची त्याने जमवाजमवही केली होती. घरातील दागिने गहाण ठेवले होते. मात्र, इतक्या मोठ्या रकमेची व्यवस्था होत नव्हती.हसनैनने आणखी कोणाचे कर्ज घेतले होते का, वसुलीकरिता कुणी तगादा लावला होता का, कुटुंबात एखाद्या जुन्या मालमत्तेचा वाद उफाळून आला होता किंवा कसे, या आर्थिक बाजूंची चाचपणी पोलिसांकडून केली जात असल्याची माहिती ठाण्याचे सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिली. आर्थिक बाजूंबरोबर सुबियाचा पुरवणी जबाब, काळ््या जादूसाठी त्याला कोणी प्रेरित केले आहे का, याबाबतही तपास सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. (प्रतिनिधी)