शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपच्या पहिल्या यादीत बहुतेक जुन्याच चेहऱ्यांना संधी; फडणवीस यांच्यासह सर्व १० मंत्री मैदानात
2
तीन आमदारांचे टेन्शन वाढले; मुंबईत नार्वेकर, लोढा, शेलार यांचा अपेक्षेप्रमाणे पहिल्या यादीत समावेश
3
भाजपच्या ठाणे जिल्हा यादीत प्रस्थापितांवरच पसंतीची मोहोर! तर्कवितर्कांना पूर्णविराम, उमेदवारी जाहीर
4
विधानसभेसाठी भाजपाकडून महामुंबईत विद्यमान २३ आमदार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार!
5
महाविकास आघाडी तुटण्याच्या दिशेने?; भास्कर जाधव कडाडले, काँग्रेसला करून दिली आठवण
6
जम्मू काश्मीरात दहशतवादी हल्ला; गांदरबल इथं गोळीबारात ३ मजूर ठार तर ५ जखमी
7
समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन; कपिल पाटील यांचा दिल्लीत पक्षप्रवेश
8
नाशिकमध्ये सीमा हिरेंच्या उमेदवारीला पक्षातच विरोध; महायुतीत बंडखोरीची शक्यता
9
"आमच्यात वाद नव्हताच..."; उमेदवारी न मिळालेल्या भाजपा आमदार अश्विनी जगपात यांचं विधान
10
१५ बैठका, ३४० तास चर्चा तरीही जागावाटप सुटेना; 'मातोश्री'तील बैठकीत काय घडलं?
11
पक्षफुटीनंतरही एकनिष्ठ राहिलेल्या आमदाराचा शरद पवारच करणार 'करेक्ट कार्यक्रम'?
12
कुटुंबवादामुळे तरुणांचे नुकसान; 1 लाख तरुणांना राजकारणात आणणार, PM मोदींची घोषणा
13
Video - मोबाईलवर बोलत रेल्वे ट्रॅक ओलांडत होता 'तो'; अचानक समोरून आली ट्रेन अन्...
14
कडक सॅल्यूट! पतीचा मृत्यू झाला पण 'तिने' हार नाही मानली; ई-रिक्षा चालवून भरतेय कुटुंबाचं पोट
15
दारुण पराभवानंतर BCCI चा मोठा निर्णय; उर्वरीत मालिकेसाठी स्टार खेळाडूला मिळाली संधी
16
नात्याला काळीमा! नातवाने त्रिशूळाने वार करून केली आजीची हत्या, शिवलिंगावर रक्ताचा अभिषेक
17
मुंबईतल्या 'या' १४ जागांवर भाजपाचे उमेदवार ठरले; ३ विद्यमान आमदार प्रतिक्षेत 
18
ज्योती मेटे यांचा शरद पवार गटात प्रवेश, विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत म्हणाल्या...
19
महिलेशी मैत्री, हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं अन्...; कसा पकडला गेला शार्प शूटर सुक्खा?
20
जास्तीत जास्त मुले जन्माला घाला, अन्यथा..; CM चंद्रबाबू नायडूंचे आवाहन, कारण काय?

फेरीवाल्यांवर ‘रोखली’ बंदूक

By admin | Published: August 30, 2016 2:50 AM

कल्याण रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाल्यांची दिवसेंदिवस वाढती दादागिरी मोडून काढण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिका आणि रेल्वे पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे

कल्याण : कल्याण रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाल्यांची दिवसेंदिवस वाढती दादागिरी मोडून काढण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिका आणि रेल्वे पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारपासून तेथे बंदूकधारी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे स्कायवॉक व स्थानक परिसर फेरीवालामुक्त झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.दोन दिवसांपूर्वी पश्चिमेला रेल्वेच्या हद्दीत व्यवसाय करणाऱ्या महिला फेरीवाल्यांचा माल रेल्वे महिला सुरक्षा बलाच्या विशेष स्कॉडने उचलून पोलीस ठाण्यात आणला. त्यामुळे चिडलेल्या फेरीवाल्यांनी जाब विचारण्यासाठी कल्याण रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस ठाणे गाठले. त्यावेळी त्यांनी विशेष स्कॉडमधील दोन कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. तर, दुर्गा तिवारी, शुभम मिश्रा, दिनेश व अन्य काहीजण त्यांच्या अंगावर धावून गेले. तसेच त्यांचा हात पिळून त्यांना मारहाणही केली. हा प्रकार पोलीस ठाण्याच्या आवारात घडल्याने एकच खळबळ उडाली. रेल्वे सुरक्षा बलाचे अन्य कर्मचारी त्या महिला कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी धावून आले. त्यांनी दुर्गा आणि शुभम यांना अटक केली. मात्र, दिनेश व साथीदार तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले.रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलीस आयुक्तांची कल्याण स्थानकाला भेट कल्याण : रेल्वे महिला सुरक्षा बलाच्या विशेष स्कॉडमधील दोन महिला कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत फेरीवाले अंगावर धावून गेल्याच्या घटनेची गंभीर दखल रेल्वे सुरक्षा बलाचे मुंबई पोलीस आयुक्त सचिन बलोदे यांनी घेतली आहे. त्यापार्श्वभूमीवर त्यांनी सोमवारी कल्याण रेल्वेस्थानकाला भेट देत दिली. यावेळी त्यांनी कल्याण-डोंबिवली रेल्वेस्थानक, पादचारी पूल व स्थानक परिसरात एकही फेरीवाला बसता कामा नये, अशी सक्त ताकीद रेल्वे पोलीस बलातील सर्व कर्मचाऱ्यांना दिली. त्यासाठी आवश्यक असलेली सर्व मदत देण्यासाठी रेल्वेचे सर्व विभागांतील अधिकारी सहकार्य करतील, असे ते म्हणाले. यावेळी त्यांच्यासोबत डोंबिवली रेल्वे सुरक्षा बलाचे प्रमुख के.के. मिश्राही उपस्थित होते. दरम्यान, बलोदे यांच्या दौऱ्यामुळे संपूर्ण स्थानक परिसर आणि रेल्वे पादचारी पुलावर एकही फेरीवाला नव्हता.महापालिका, रेल्वेचे पोलीस तैनातफेरीवाल्यांकडून होणारे हल्ले आणि दादागिरी मोडीत काढण्यासाठी महापालिका प्रशासनाने १० पोलीस व १० विशेष सुरक्षा कर्मचारी नेमले आहेत. रात्री दुप्पट कर्मचारी नेमले जात आहेत. रेल्वेनेही रेल्वे सुरक्षा बलातील पिस्तूलधारी दोन महिला व चार पुरु ष कल्याण रेल्वेस्थानक परिसरात तैनात केले आहेत.कल्याणमध्ये फेरीवाल्यांकडून रेल्वे महिला पोलिसांना मारहाण झाली होती. या घटनेची दखल घेत रेल्वेने आज पूल फेरीवालामुक्त केला आहे. रेल्वे व पोलिसांनी कारवाईत सातत्य ठेवले पाहिजे. तरच, आम्हाला निर्धास्तपणे स्कायवॉकवरून चालता येईल.- दीपक गुप्ता, प्रवासीसर्वसामान्य नागरिकांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून हा पादचारी पूल बांधला आहे. मात्र, हा पूल प्रवाशांसाठी नाही तर फेरीवाल्यांसाठीच असल्याचे पाहायला मिळते. आज रेल्वेचे मोठे साहेब येणार म्हणून फेरीवाले गायब झाल्याचे समजले. त्यामुळे या साहेबांचे प्रथम धन्यवाद. त्यांनी आठवड्यातून २ ते ३ वेळा तरी स्थानकाला भेट द्यावी, जेणेकरून हा पादचारी पूल नागरिकांना अशाच प्रकारे मोकळा मिळेल.- नेहा मिरजकर, प्रवासी