शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

हंडाभर पाण्यासाठी करावी लागतेय पायपीट, मुरबाड तालुक्यातील चित्र

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2021 1:50 AM

मुरबाड तालुक्यात पाणीटंचाई जाणवायला सुरुवात झाली आहे. १८९ योजनांवर कोट्यवधी खर्च केला असला तरी या योजनांची काही ठिकाणी जलकुंभ, उघड्यावर जलवाहिन्या, दारात नळ असूनही पाण्याची बोंब. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहे.

मुरबाड - मुरबाड तालुक्यात पाणीटंचाई जाणवायला सुरुवात झाली आहे. १८९ योजनांवर कोट्यवधी खर्च केला असला तरी या योजनांची काही ठिकाणी जलकुंभ, उघड्यावर जलवाहिन्या, दारात नळ असूनही पाण्याची बोंब. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. गावात एखाद्या हातपंपाला पाणी असेल तर तिथेच साऱ्या गावाची झुंबड उडते. उन्हाळा जस-जसा वाढत जातो तस-तशी भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होते. त्यामुळे पाण्याचे साठेही तळ गाठायला लागतात. पूर्वी ज्या गावात बारमाही पाण्याची सोय आहे अशा गावातच मुली दिल्या जात असत. ज्या गावात नेहमीच पाणीटंचाई त्या गावात मुलगी दिली जात नव्हती. नंतर तिला पाणी भरण्याचा त्रास हा सहन करावा लागणार. हीच परिस्थिती वाढते नागरीकरण व औद्योगिकीकरणामुळे निर्माण झालेली आहे. उन्हाळ्यात पाण्यासाठी रात्रभर जागे राहावे  लागते. मुरबाड तालुक्यातील पाटगाव, खोपीवली, घागुर्ली, मेर्दी, म्हाडस, सासणे. केवारवाडी, करचोंडे, तळेगांव, बाटलीची, साजई, फांगवाडी, खांड्याचीवाडी, वाघावाडी (पेंढरी), लोत्याची वाडी या गावात आणि आदिवासी पाड्यात आजही ही परिस्थिती आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी डिसेंबरपासून तेथील नागरिक हे प्रशासनाकडे टँकरची मागणी करतात. मात्र, कागदी घोडे नाचविणारे प्रशासन मार्च महिन्याची दाहकता वाढत असतानाही वास्तव जाणून घेण्यासाठी  चालढकल करत आहेत. यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. तालुक्यातील टंचाईग्रस्त भागातील नागरिकांकडून टँकरच्या मागणीचे प्रस्ताव आले आहेत. त्यांना एक एप्रिलपासून पाणीपुरवठा केला जाणार आहे.    - अमोल कदम, तहसीलदार.   तालुक्यातील २१ गावे व ३२ पाड्यांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली असली त्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.     - राधेश्याम आडे, उपअभियंता,     पाणीपुरवठा विभाग  पाणीटंचाईअभावी रहिवासी त्रस्त वासिंद : येथील  खातिवलीजवळील शुभगृह संकुलात गेल्या दोन महिन्यांपासून पाणीसमस्या निर्माण झाल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत. याठिकाणी महिनाभरापासून टँकरने पाणीपुरवठा होत आहे. या गृहसंकुलात पाच विंग असून जवळपास १३०० सदनिका आहेत. दोन महिन्यांपासून  येथील गृहसंकुल व्यवस्थापनाकडून  या सोसायट्यांना पुरवठा करण्यात येत असलेला पाणीपुरवठा सुरळीत नसल्याने रहिवाशांची गैरसोय होत आहे, असे रहिवासी भगवान चव्हाण यांनी सांगितले.  या संकुलात पाणी उपलब्ध व्हावे म्हणून  ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जलवाहिनी जोडलेली आहे. त्यासाठी लागणाऱ्या वीटमीटर जोडणीचे काम सध्या सुरू आहे. nया मीटरच्या जोडणीनंतर मुबलक व नियमित पुरवठा सुरू होणार असल्याचे उपसरपंच साईनाथ काबाडी यांनी सांगितले.

टॅग्स :Waterपाणीmurbadमुरबाडthaneठाणे