ठाणे : अयोग्य कारणास्तव ग्राहकाचा आरोग्य विमा दावा नाकारणा-या युनिव्हर्सल सोम्पो जीआयसी लिमिटेडसह टीके हेल्थकेअर टीपीए प्रायव्हेट लिमिटेडला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने ३५ हजाराचा दंड सुनावला आहे.लक्ष्मी गणपथीरामन आणि सुंदरेसन गणपथीरामन यांनी दोघांसाठीही विमा कंपनीकडून मे २००९ ते २०१० या काळासाठी २ लाखांची विमा पॉलिसी घेतली होती. ते नियमित प्रिमियम भरून पॉलिसीचे नूतनीकरण करत होते. सुंदरेसन यांना पॉलिसी घेण्यापूर्वी आजार नव्हता. मात्र, नंतर त्यांना हृदयविकाराचा त्रास जाणवला व त्यावर उपचार घेतले. त्याबाबत कंपनीकडे विमा दावा दाखल केला असता आजाराबाबत आधी न कळविल्याचे कारण देऊन कंपनीने तो दावा फेटाळला. त्यामुळे त्यांच्याविरोधात मंचामध्ये तक्रार दाखल केली. विमा कंपनीसह त्यांच्या थर्डपार्टी अॅडमिनिस्ट्रेटरला मंचाने नोटीस पाठवली. मात्र, कोणीही आपली बाजू स्पष्ट केली नाही.कागदपत्रे, पुरावे यांची पडताळणी केली असता लक्ष्मी गणपथीरामन आणि सुंदरेसन यांनी पॉलिसी घेतली होती. तेव्हा त्यांना हृदयविकाराचा आजार नव्हता. नंतर तो जडल्याने केलेल्या उपचारांची सगळी बिले मंचात आहेत.>मंचाची सदोष सेवाहृदयविकाराचा त्रास पॉलिसी घेण्यापूर्वी होताच हे विमा कंपनी किंवा थर्डपार्टी अॅडमिनिस्ट्रेटरने सिद्ध केलेले नाही. कोणतेही ठोस कारण पुराव्यासह न देता विमा दावा फेटाळून कंपनीने सदोष सेवा दिल्याचे, मंचाने स्पष्ट केले.
हेल्थ केअर कंपनीला ३५ हजारांचा दंड, अयोग्य कारणास्तव नाकारला दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 3:33 AM