शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

नव्या कळवा खाडी पुलाच्या आर्युमानासाठी बसविले जाणार आरोग्य तपासणी यंत्र, संभाव्य धोके टाळण्यासाठी पालिकेचे पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 4:59 PM

भविष्यातील संभाव्य धोका लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने कळवा - ठाणे खाडी पुलावरील तिसऱ्या खाडी पुलासाठी आतापासून खबदारी घेण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार या पुलावर आरोग्य तपासणी संयत्र बसविले जाणार आहे. यासाठी १३० कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आाला आहे.

ठळक मुद्देडिसेंबर अखेर होणार पुल खुलाभविष्यातील संभाव्य धोके टाळण्यासाठी प्रयत्न

ठाणे - ठाणे कळवा खाडीवर पुलावर उभारण्यात येणाऱ्या तिसऱ्या पुलाचे काम आता डिसेंबर अखेर पूर्ण करण्याचा दावा पालिकेने केला आहे. परंतु भविष्यात या पुलावरील वाढत्या वाहनांची संख्या लक्षात घेता या पुलाचे आयुर्मान उत्तम राहावे या उद्देशाने ठाणे महापालिकेने या पुलावर आरोग्य तपासणी यंत्रणा (नेगीव्हेशन स्पॅन स्ट्रक्चरल हेल्थ मॉनिटर सयंत्र) बसविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. शास्त्रीय पध्दतीने ही यंत्रणा पुलाच्या आरोग्याची तपासणी करणार असून त्याआधारे प्रशासनाला तात्काळ उपाययोजना करणे शक्य होणार आहे.                त्यानुसार या संदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे. मुंबईत सी लिंक या सागरी सेतुच्या धर्तीवर ठाणे महापालिकेने देखील विटावा पुलाखालील आणि एकूणच या भागातील वाहतुक कोंडी सुटावी यासाठी या कळवा खाडी पुलावर तिसरा नवीन पुलाच्या कामाचा प्रस्ताव जानेवारी २०१२ मध्ये पुढे आणला होता. सध्या येथील कळवा खाडीवर एक ब्रिटीश कालीन आणि आणखी एक पुल आहे. परंतु ब्रिटीश कालीन पुल कमकुवत झाल्याने त्या पुलावरील वाहतुक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे दुसऱ्या  पुलावर वाहतुकीचा वेग मंदावला आहे. परंतु दुसरा पुलही वाहतुकीसाठी कमी पडू लागल्याने पालिकेने तिसºया पुलाचा पर्याय पुढे आणला. महापालिकेने २०११ च्या आर्थिक वर्षात यासाठी १० कोटींची तरतुद केली होती. त्यानंतर आता या पुलासाठी १८३ कोटींचा खर्च केला जाणार आहे. जुन्या दोन पुलांच्या बाजूलाच मात्र त्यांच्यापेक्षा थोड्या उंचीवर हा पुल उभारण्यात येणार आहे.असा असणार पुल...ठाण्याकडून विटाव्याकडे जाण्यासाठी हा वनवे पुल असणार आहे. तर विटाव्याकडून येणाºया वाहनांसाठी जुन्या पुलाचा पर्याय ठेवण्यात आला आहे. या तिसऱ्या पुलामुळे येथील वाहतुक कोंंडी सुटण्यास मदत होणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे. ठाण्याकडून खारेगांव (मनिषा नगर) आणि विटाव्याच्या पुढे म्हणजेच ठाणे - बेलापुर दिशेला असा दोनही मार्गाने हा पुल खाली उतरणार आहे. तसेच कळव्याकडून ठाण्याकडे येतांना हा पुल साकेत, जेल तलाव आणि कोर्टनाका मार्गे ठाणे स्टेशनकडे खाली उतरणार आहे. तसेच आता यात थोडा बदल करण्यात आला असून, आत्माराम चौक पर्यंत रस्ता या पुलाला जोडण्यात येणार आहे. केबल स्टेड टाईपचा हा पुल असणार असून तो दिड किमीचा असणार आहे. यामुळे विटाव्या पुलाखालील आणि कळवा नाक्यावर होणारी वाहतुक कोंडी फुटणार असल्याचेही पालिकेचे म्हणने आहे.डिसेंबर अखेर होणार पुलाचे कामदरम्यान येत्या डिसेंबर अखेर या पुलाचे काम पूर्ण होईल असा दावा आता पालिकेने केला आहे. असे असतानाच आता या पुलावर बांधकाम आरोग्य तपासणी यंत्रणा (नेगीव्हेशन स्पॅन स्ट्रक्चरल हेल्थ मॉनिटर सयंत्र) बसविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या पुलावरील भविष्यातील संभाव्य अपघातांचे धोके टळावेत आणि पुलाच्या दुरु स्तीसाठी मोठा खर्च निघू नये, त्याचे आयुर्मान उत्तम राहावे, या उद्देशातून ही यंत्रणा बसविण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. यासाठी १३० कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.      नेगीव्हेशन स्पॅन स्ट्रक्चरल हेल्थ मॉनिटर सयंत्राचे सेन्सर पुलाच्या बांधकामामध्ये बसविले जाणार आहे. पुलाच्या पायाभरणीमध्येच हे सेन्सर बसविले जाणार आहेत. या सेन्सरमुळे पुलाच्या खाली सुरु असलेल्या हालचालींच्या आधारे त्याच्या आरोग्याची नोंद होणार आहे. त्यामुळे भविष्यात या पुलाला मोठा धोका निर्माण होणार असेल तर त्याची माहिती आधीच सेन्सरद्वारे पालिकेला उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पुलाचे संभाव्य धोके टाळून त्यावर तात्काळ उपाययोजना करणे पालिकेला शक्य होणार आहे. तसेच पुलाचे आयुर्मान वाढविण्यास मदत होणार आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली. त्यानुसार येत्या २० मार्चच्या महासभेत या संदर्भातील प्रस्ताव मान्यतेसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे.दुसऱ्या पुलाला बसविण्याचा होता प्रयत्ननेगीव्हेशन स्पॅन स्ट्रक्चरल हेल्थ मॉनिटर सयंत्र दुसऱ्या  खाडी पुलावर बसविण्याचा विचार महापालिका प्रशासनाचा होता. मात्र, या पुलावर ही यंत्रणा बसविणे शक्य नसल्याची बाब पालिकेच्या निदर्शनास आली आहे. असे असले तरी शहरातील सॅटीस, मुंब्रा बायपास तसेच अन्य पुलांच्या ठिकाणी ही यंत्रणा बसविता येऊ शकते का, याचीही चाचपणी पालिकेकडून करण्यात येणार आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाkalwaकळवा