शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
5
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
6
केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
7
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
8
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
9
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
10
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
11
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
12
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
14
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
15
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
16
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
17
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
18
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
19
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
20
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य

आरोग्य विभागाची बेफिकीरी, १६ महिन्याच्या बाळाचा मृत्यू?; कुटुंबाचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 7:10 AM

मृत्यू झालेल्या सर्वेश अशोक धोडी याला १० फेब्रुवारी रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र वाशाळा येथील नर्सने घरी जाऊन या बाळाला एमआर व ट्रिपल बूस्टर डोस दिला होता

मोखाडा : तालुक्यातील कोशिमशेत या गावात एका १६ महिन्यांच्या मुलाला एमआर व ट्रिपल बूस्टर डोस दिल्यानंतर त्याचा मृत्यू झाला असा आरोप त्याच्या नातेवाइकांनी केला आहे. आरोग्य विभागाच्या बेफिकीरीमुळे मुलाचा मृत्यू झाला असे नातेवाइकांचे म्हणणे आहे.मृत्यू झालेल्या सर्वेश अशोक धोडी याला १० फेब्रुवारी रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र वाशाळा येथील नर्सने घरी जाऊन या बाळाला एमआर व ट्रिपल बूस्टर डोस दिला होता. पण सर्वेशला ९ फेब्रुवारी रोजी १६ महिने पूर्ण झाले असल्याने उशिराने डोस द्या, असे आपण नर्सला सांगितले, पण त्यांनी ऐकले नाही, असा आरोप सर्वेशच्या आई मंगला यांनी केला आहे.

हा डोस दिल्यानंतर थोड्या वेळातच सर्वेशला ताप आला, पण डोस दिल्याने ताप आला असावा, असे वाटल्याने त्याच्या आईने नर्सने दिलेले औषध त्याला दिले. पण तरीही त्याला बरे न वाटल्याने १२ तारखेला त्याचे कुटुंबीय त्याला खोडाळा येथील खासगी दवाखान्यात घेऊन गेले. ताप खूप असल्याने बाळाला आकडी येत असल्याने खासगी दवाखान्यात त्याच्यावर उपचार करण्यात आले नाहीत, असाही आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. आरोग्य विभागातर्फेही या प्रकरणी चौकशी करत असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी भाऊसाहेब चत्तर यांनी दिली आहे.

टॅग्स :Healthआरोग्य