ठाणे - महाराष्ट्र राज्य आशा - गटप्रवर्तक कृती समितीच्या वतीने राज्य भरातील आरोग्य सेवेत कार्यरत असलेल्या आशा व कर्मचारी त्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी व जानेवारपासून रखडलेले मानधन प्राप्ती आदी मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधणार, यासाठी ते 11 ते 13 मे या तीन दिवसांच्या कालावधीत काळ्या फिती लावून काम करणार आहेत.
महाराष्ट्र राज्य आशा - गटप्रवर्तक कृती समितीच्या नेतृत्व खाली आशा व गटप्रवर्तक सोमवारपासून पुढील तीन दिवस काळ्या फिती लावणार असल्याचे या कृती समितीणे अध्यक्ष एम ए पाटील व राज्य गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघाचे सचिव राजेश सिंह यांनी सांगितले. कृती समीतीने ठरवलेल्या या आंदोलनात 100 कर्मचारी सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. या आशा व गटप्रवर्तकांना अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा आरोप केला जात आहे.
या आंदोलनाद्वारे आशा व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारीचा दर्जा द्या, शासकीय आदेश प्रमाणे, आशा ना दोन हजार रुपये सप्टेंबर पासून त्वरित देण्यात यावे. याप्रमाणेच गटप्रवर्तकांना अतिरिक्त निश्चित दहा हजारांचे मानधन मिळावे. शहरी आशा स्वयंसेविकांना प्रोत्साहनपर राशी मार्च महिन्या पासून देण्यात यावी, या कर्मचाऱ्यांना 'कोव्हिड १९' पासून संरक्षण मिळवण्यासाठी सर्व साहित्य देण्यात यावे. कोरोनाच्या कालावधीत कर्मचाऱ्यांचा या कर्मचाऱ्यांचा कोणतेही कारणाने मृत्यू झाला तर, त्यांचा कुटुंबातील सदस्यांना ५० लाख रुपयांचा बीमा राशी देण्यात यावी आदी मागण्या या तीन दिवशीय आंदोलनाद्वारे या कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
Mother's Day 2020 : रोहित पवारांनी आईसाठी केली 'ही' खास गोष्ट
CoronaVirus News : कोरोनाचे थैमान! ग्रीन झोन होत आहेत रेड झोन?; 'या' जिल्ह्यांत नवे रुग्ण
CoronaVirus News : धक्कादायक! राज्यातील 786 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह, सात जणांचा मृत्यू
CoronaVirus News : चिंताजनक! देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला, रुग्णांची संख्या 62,939 वर
CoronaVirus News : धोका वाढला! महाराष्ट्राने वाढवली सरकारची चिंता
CoronaVirus News : त्यांचा तो प्रवास ठरला अखेरचा! लॉकडाऊनमध्ये भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू, 11 जखमी
CoronaVirus News : 'हा' आजार असलेल्या कोरोनाग्रस्तांना मृत्यूचा तिप्पट धोका