जितेंद्र कालेकर
ठाण्यातील काही व्यापाऱ्यांनी मिळून ठाणे रेल्वे स्थानकाजवळ सुरु केलेल्या जगदंबा सहाय्यक सेवा संघ गणेशोत्सव मंडळाने उत्सवाबरोबरच सामाजिक बांधिलकीही जपली आहे. उत्सव केवळ दहा दिवसांचा असला तरी वर्षाचे ३६५ दिवस आणि चोवीस तास या मंडळाची रुग्णवाहिका ही रेल्वेतून पडून जखमी होणाऱ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी मोफत सेवा देत आहे. मंडळाने गेल्या २७ वर्षामध्ये हजारो प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत, अशी माहिती मंडळाचे सल्लागार मार्कस लोंढे यांनी दिली.
ठाणे रेल्वे स्थानकालगत फलाट क्रमांक दोनच्या बाजूला सॅटीस पुलाच्या खाली जगदंबा सहाय्यक सेवा संघ गणेशोत्सव समितीने गणेशोत्सवाची प्रतिष्ठापना केली आहे. यंदा मंडळाचे ३१ वे वर्ष आहे. महाराष्टÑ प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव कै. शामसुंदर खन्ना यांनी १९८८ मध्ये या गणेशोत्सवाची स्थापना केली. सध्या राजेश धवन अध्यक्ष असून अनिल धवन हे उपाध्यक्ष आहेत. तन्मय खन्ना हे खजिनदार तर सचिव म्हणून तुषार खन्ना हे जबाबदारी सांभाळतात. याशिवाय, संतोष कसोटीया हे सदस्य तर पिंटू जयस्वाल आणि राजू जयस्वाल हे मंडळाचे सक्रीय कार्यकर्ते आहेत. मंडळामध्ये सात पदाधिकारी असले तरी २० ते २५ कार्यकर्ते मंडळामध्ये सक्रीय असल्याचे मंडळाचे अध्यक्ष राजेश धवन यांनी सांगितले. अनंत चतुर्दशीपर्यंत साजरा होणाºया या गणेशोत्सवात ठाणे रेल्वे स्थानकातून येणारे-जाणारे हजारो प्रवासी दर्शनासाठी येतात. त्यामुळे पहाटे ४.४५ वाजता ठाण्यातून सुटणाºया पहिल्या गाडीपासून ते शेवटच्या पहाटे १.४५ वाजताच्या गाडीपर्यंतचे प्रवासी याठिकाणी दर्शनाला आवर्जून येत असल्याचे मंडळाचे कार्यकर्ते सांगतात.
यंदा मंडळाने इंद्राच्या दरबाराची सजावट साकारली आहे. इंद्रलोकातील नर्तिका आणि दरबारातील नक्षीकाम लक्षवेधी ठरले आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गेली आठ ते दहा दिवस परिश्रम घेऊन ही सजावट साकारली आहे.मंडळाने दिला रुग्णांना मदतीचा हात...ठाणे रेल्वे स्थानकालगतच या मंडळाचा उत्सव साजरा होत असल्याने अनेकदा रेल्वेतून पडलेल्या प्रवाशांना वेळीच मदत न मिळाल्याने त्यांना आपले प्राण गमवावे लागत असल्याची बाब मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आली.सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून मंडळातील दानशूर पदाधिकाºयांनी काही निधी संकलित करुन १९९२ मध्ये रुग्णवाहिका खरेदी केली. तेंव्हापासून ही रुग्णवाहिका रेल्वे तसेच जवळपासच्या कोणत्याही अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय अथवा खासगी रुग्णालयापर्यंत नेण्याची मोफत सेवा देत आहे.
रंगपूजेचा उत्सवगणेश विसर्जनाच्या आधी देवाला आनंदाने निरोप देण्यासाठी दक्षिण भारतात प्रचलित असलेली रंगपूजा याठिकाणी अनंत चतुर्दशीच्या दोन दिवस आधी केली जाते. केळीच्या १०८ वेगवेगळया पानांमध्ये गुळ आणि पोह्याचा प्रसाद ठेवला जातो. तो श्रीगणेशाच्या १०८ वेगवेगळया नावांचा मंत्रोच्चारांनी विधीवत पूजा करुन ठेवण्यात येतो. हा सोहळा आणि पूजेसाठी हजारो दक्षिण भारतीय भाविक आवर्जून भेट देतात. या पूजेमुळेही हा उत्सव वेगळया प्रकारे लक्षवेधी ठरला आहे. या पूजेच्या दूसºया दिवशी सत्यनारायणाची पूजा केली जाते. या पूजेलाही भाविकांची मोठी गर्दी असते.