१ एप्रिलला राहुल गांधी यांच्या हजेरीवर सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2023 09:33 AM2023-03-05T09:33:18+5:302023-03-05T09:35:33+5:30
दाव्याची पुढील सुनावणी १ एप्रिल रोजी होणार असल्याचे न्यायाधीश एल. सी. वाडीकर यांनी सांगितले.
भिवंडी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान भिवंडीतील एका जाहीर सभेत महात्मा गांधी हत्या व आरएसएसच्या सहभागाबाबत केलेल्या वक्तव्यासंदर्भात भिवंडी न्यायालयात दाखल अवमान याचिकेवरील सुनावणी शनिवारी भिवंडीत झाली. दाव्याची पुढील सुनावणी १ एप्रिल रोजी होणार असल्याचे न्यायाधीश एल. सी. वाडीकर यांनी सांगितले.
सुनावणीदरम्यान फिर्यादी राजेश कुंटे यांच्या वतीने ॲड. नंदू फडके यांनी बाजू मांडली तर खा. राहुल गांधी यांची बाजू ॲड. नारायण अय्यर यांनी मांडली. अय्यर यांनी सांगितले की, गांधी हे दिल्लीचे रहिवासी असून लोकसभा सदस्य आहेत. गांधी यांच्या अनुपस्थितीत त्यांचे वकील खटला चालवतील, त्यांना न्यायालयात हजर राहण्याबाबत कायमस्वरूपी सूट मिळावी, याबाबत शनिवारी न्यायालयात युक्तिवाद झाला. यावर सविस्तर युक्तिवाद १ एप्रिल २०२३ रोजी केला जाणार आहे.