राहुल गांधी यांची भिवंडी कोर्टात ६ जुलैला सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2019 01:00 AM2019-07-04T01:00:44+5:302019-07-04T01:00:57+5:30
भिवंडीत ६ मार्च २०१४ रोजी झालेल्या प्रचारसभेत राहुल गांधी यांनी महात्मा गांधी यांची हत्या आरएसएसने घडविल्याचा आरोप केला होता.
भिवंडी : आरएसएसच्या बदनामीप्रकरणी भिवंडी न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीसाठी ६ जुलै रोजी काँगे्रसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे स्वत: भिवंडी न्यायालयात हजर राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
भिवंडीत ६ मार्च २०१४ रोजी झालेल्या प्रचारसभेत राहुल गांधी यांनी महात्मा गांधी यांची हत्या आरएसएसने घडविल्याचा आरोप केला होता.
गुरुवारी राहुल गांधी हे मुंबईच्या शिवडी न्यायालयात स्वत: हजर राहणार असल्याने भिवंडीत होणाऱ्या ६ जुलैच्या सुनावणीदरम्यान ते हजर राहतील की नाही, याबाबत अधिकृत माहिती शुक्रवारी देता येईल, अशी प्रतिक्रिया त्यांचे भिवंडीतील वकील अॅड. नारायण अय्यर यांनी दिली.