ठाणे : प्रत्येकालाच आपल्या जन्मभूमीचा अभिमान असतो. हाच अभिमान शब्द-स्वरांतून व्यक्त करण्यासाठी लोकमतच्या ‘काहीतरी कर ठाणेकर’ मोहिमेंतर्र्गत रविवारी सायंकाळी कोरम मॉल येथे ठाणे शहाराचे वैशिष्ट्य सांगणाऱ्या गाण्यांचा शुभारंभ करण्यात आला. या गाण्याचे शब्द ठाण्यातील अदिती जहागीरदार हिने लिहिले असून ठाणेकर युवकांनी सुरूकेलेल्या आणि आशिया खंडातील पहिला मराठी रॉक बॅण्ड असणाऱ्या मोक्ष या संस्थेने संगीतबद्ध केले. या वेळी त्यांनी हरपले देहभान धावत ये पांडुरंग, नवा हवा इतिहास, वो जो अधुरी सी बात बाकी है, रूप तेरा मस्ताना, हम्मा-हम्मा, घे भरारी, नम:शिवाय, वंदे मातरम् यासारखी गाणी कोरममध्ये उपस्थित असणाऱ्या ठाणेकरांना ऐकविली. या वेळी लोकमत समूहाचे उपाध्यक्ष विजय शुक्ला, ब्रॅण्ड अध्यक्ष मंदिर तेंडोलकर, सहायक महाव्यवस्थापक राघवेंद्र शेट यांच्या हस्ते मोक्ष बॅण्डचा संस्थापक सागर जोशी तसेच पुष्कर कुलकर्णी, प्रदीप पवार, गायक अमरीश केळकर, ओमकार आदींचा सत्कार केला. या वेळी सारथीचे जाहिरात एजन्सीचे अमोल धर्मे, चित्रांकुरचे जाहिरात एजन्सीचे विकास फडके, कवी अमोल पंडित आदी मान्यवर उपस्थित होते. ठाणेकर नागरिकांची मने जागृत करण्याचे कामही काहीतरी कर ठाणेकर या उपक्रमाद्वारे लोकमत करीत आहे. या उपक्रमाला मन:पूर्वक शुभेच्छा. - अमोल धर्मे, सारथी
दिल से आम्ही ठाणेकर..
By admin | Published: October 15, 2015 1:37 AM