शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

उष्णतेच्या लाटेचा धोका; कोणती काळजी घ्यावी? प्रशासनाने सांगितल्या उपाययोजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 21:52 IST

मार्च ते मे या कालावधीत ठाणे जिल्ह्यात संभाव्य उष्णतेची लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Weather Update: प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई, भारतीय हवामान विभाग यांच्याकडून १३ मार्चपर्यंत ठाणे जिल्ह्यात काही भागात उष्णतेची लाट येण्याबाबत हवामान अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच मार्च ते मे या कालावधीत ठाणे जिल्ह्यात संभाव्य उष्णतेची लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानुषंगाने उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काय करावे व काय करू नये याबाबतच्या मार्गदर्शक सूचना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जारी करण्यात आल्या आहेत.  

उष्णतेची लाट: नागरिकांनी काय करावे व काय करू नये?

उष्णतेच्या लाटेमुळे शारीरिक ताण निर्माण होऊन मृत्यू होण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेदरम्यान परिणाम कमी करण्यासाठी आणि उष्मघातामुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी खालील उपाय करू शकता.

तहान लागलेली नसली तरीही अधिकाधिक पाणी प्यावे.हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.बाहेर जातांना गॉगल्स, छत्रो/टोपी, बुट व घपलाचा वापर करावा.प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी.उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकावा.शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनवण्यात आलेली लस्सी, तोरणी, लिंबू पाणी, ताक इत्यादीचा नियमित वापर करावा.अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावित व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.गुरांना छावणीत ठेवावे. तसेच त्यांना पुरेसे पिण्याचे पाणी द्यावे.घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात.पंखे, ओले कपडे यांचा वापर करावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे.कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.सूर्य प्रकाशाच्या थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सुचित करावे.पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करावा.बाहेर कामकाज करीत असताना अधून मधून विश्रांती घेऊन नियमित आराम करावा.गरोदर कामगार व आजारी कामगारांची अधिकची काळजी घ्यावी.रस्ताच्या कडेला उन्हापासून संरक्षणाकरिता शेड उभारावेत.जागोजागी पाणपोईची सुविधा करावी.उष्माघातापासून बचाव करण्यासाठी काय करू नयेलहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेऊ नये.दुपारी १२ ते ३.३० या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे.गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.बाहेर तापमान अधिक असल्यास शारिरीक श्रमाची कामे टाळावीत. दुपारी १२ ते ३.३० या कालावधीत बाहेर काम करणे टाळावे.उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे. तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाकघराची दारे व खिडक्या उघड्या ठेवाव्यात.ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी उष्माघातापासून बचाव करण्यासाठी वरील सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अशोक शिनगारे आणि निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप माने यांनी केले आहे. 

टॅग्स :weatherहवामान अंदाजHeat Strokeउष्माघातthaneठाणे