भिवंडी: भिवंडीत रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली असल्याने शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. शहरातील तीन बत्ती,भाजी मार्केट,दर्गा रोड,म्हाडा कॉलनी,ईडगाह ,पद्मानगर , धामणकर नाका, ७२ गाळा,नारपोली,कल्याण नाका अशा नाईक ठिकाणी पावसाचे पाणी साचले आहे,त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
शहरातील निजामपुरा भाजी मार्केट, गुलजार कोल्ड्रिंक हाऊस परिसरात कंबरभर पाणी साचले होते.रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे शहरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.या वाहतूक कोंडीतून प्रवास करतांना वाहन चालकांसह नागरिकांचे मोठे हाल झाले होते. शहरातील भंडारी कंपाउंड ते दर्गाह नाका या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक नागरिकांनी रस्सी बांधून या रस्त्यावरची ये जा बंद केली होती.कामतघर येथील वऱ्हाळादेवी तलाव देखील ओव्हरफ्लो झाला असून परिसरातील अनेक रहिवासी संकुलनांमध्ये देखील पाणी शिरले होते.अंजुरफाटा ओसवाल स्कुल परिसरात देखील प्रचंड पाणी भरल्याने येथील नागरिकांना देखील प्रचंड त्रास सहन करावा लागला.
तर अंजुरफाटा, राहनाळ ,काल्हेर येथे रस्त्यावर पाणी साचल्याने ठाणे काल्हेर अंजुरफाटा रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती तर दापोडा परिसरात पाणी साचल्याने मानकोली अंजुरफाटा रस्त्यावरहि वाहतूक कोंडी झली होती.मुंबई नाशिक महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे या मार्गावर देखील।प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.