ठाणे : मंगळवारी पावसाने मुसळधार सुरूवात केल्यानंतर दुपारनंतर विश्रांती घेतली होती. मात्र रात्री पासून पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावली. तर बुधवारी पहाटे पासूनच पावसाने ठाणे शहरालाही चांगलेच झोडपून काढले. दरम्यान, २१ जुलैपर्यंत मुसळधार पावसाच्या इशाºयामुळे ठामपाची टीडीआरएफ आणि केंद्राची एनडीआरएफची टीम अलर्ट मोडवर असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. याशिवाय शहरातील काही सखल भागात पाणी साचल्याचे दिसून आले. तर काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवर झाल्याचे दिसून आले. त्यामुळे वाहतुक कोंडी झाल्याचे चित्र दिसून आले. सात तासात ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षेत तब्बल ३० तक्रारी दाखल झाल्या असून त्यामध्ये १२ तक्रारी या झाडे कोसळल्याचा आहेत. तर आठ ठिकाणी पाणी साचले असून दिवा आणि भाईंदर पाड्यात एकूण १५ घरांमध्ये पाणी शिरले होते. याशिवाय उपवन तलावात पोहण्यासाठी उरलेल्या दोन तरुणांना वाचविण्यात टीडीआरएफच्या तुकडीला यश आले आहे.
एकीकडे हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर पावसाने जिल्ह्यातील ग्रामीण भागांसह शहरी भागात आपली दमदार हजेरी लावली आहे. मुसळधार पडणाऱ्या पावसाने जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले होते. सातत्याने सुरू असलेल्या पावसाने वातावरणात गारवा आहे. गेल्या चोवीस तासात ठाणे शहरात ९०.०८ मीमी पावसाची नोंद झाली असताना, त्याच चोविसात आपत्ती व्यवस्थापन कक्षेत ३६ तक्रारींची नोंद झालेली आहे. यामध्ये १३ ठिकाणी झाडे पडलेली आहेत. यामध्ये काही झाडे पडल्याने वाहनांचे नुकसान झाले आहे. एका ठिकाणी सोसायटीची सुरक्षा भिंत कोसळली आहे. तर सहा ठिकाणी झाडाच्या फांदया तुटून पडल्या आहेत. दोन ठिकाणी पाणी साचल्याची तक्रार प्राप्त झाल्या होत्या. याशिवाय ३ ठिकाणी आग लागली होती. तर १० अन्य तक्रारींचा ही यामध्ये समावेश आहे.
बुधवारी पहाटे जोराचा वारा सुटला होता. मात्र सकाळी वाऱ्याचा जोर कमी झाल्यावर पावसाचा जोर वाढला. त्यातच सकाळी साडेआठ वाजल्यापासून दुपारी साडेतीन वाजेपर्यंत म्हणजे सात तासात ८०.०० मिमी नोंदवला गेला आहे. पहिल्या दोन तासात २२.६० मिमी पाऊस पडला. शेवटच्या दोन तासात म्हणजे साडेतीन ते साडेपाच वाजण्याच्या दरम्यान ३८.११ मिमी पाऊस पडल्याची नोंद आपत्ती व्यवस्थापन कक्षात करण्यात आली आहे. तसेच या सात तासात तब्बल ३० तक्रारी दाखल झाल्या असून त्यामध्ये १२ ठिकाणी झाडे कोसळली आहेत. ५ ठिकाणी झाडांच्या फांदया तुटून पडल्या आहेत. एका ठिकाणी आग लागली असून आठ ठिकाणी पाणी साचल्याची नोंद झाली आहे. तर सहा अन्य ही तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत.आठ ठिकाणी पाणी साचल्याचा तक्रारीशहरातील वंदना टॉकीज या सखल भागासह कोपरी, सिद्धार्थनगर, दिवा धर्मवीर नगर, दिवा- मुंब्रा देवी कॉलनी, दिवा चंद्रायनी सोसायटी येथे, मुंब्रा शिबलीनगर, मुंब्रा- खान कंपाऊंड, वागळे इस्टेट नेहरूनगर आणि भाईंदर पाडा या ठिकाणी पाणी साचले. दिवा, भाईंदर पाड्यात शिरले १५ घरात पाणीपाणी साचल्याचा तक्रारींमध्ये दिव्यातील धर्मवीर नगरमधील गटार चॉकअप झाल्याने कोकण विहार चाळी पाणी साचून ८ घरात पाणी शिरले होते. तसेच भाईंदर पाडा परिसरातील वाढवीपाड्यात ७ घरांमध्ये पाणी शिरले होते. अशाप्रकारे एकूण येवढ्या घरांमध्ये पाणी शिरल्यानंतर तेथे पाणी पंप पाण्याचा निचरा करण्यात आला अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.