ठाणे - गेल्या काही दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने शुक्रवारी पुन्हा दमदार हजेरी लावली असल्याचे दिसून आले. त्यामुळे मागील दोन ते तीन दिवसापासून उकाड्यामुळे हैराण झालेल्या ठाणेकरांची सुटका झाली. शुक्रवारी दुपारी १२.३० ते २.३० या तीन तासात १६.५७ मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली. अचानक सुरू झालेल्या पावसाने चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. तर, अनेक शहरातील अनेक रस्ते जलमय झाले असल्याचे चित्र दिसून आले.
मागील काही दिवसापासून वातवरणात उकडा वाढला होता. त्यात वाढता उकाडा आणि घामाच्या धारा यांमुळे नागरिक चांगलेच हैराण झाले होते. त्यात शुक्रवारी सकाळी वातवरणात बदल होवून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे वातवरणात कमालीचा गारवा निर्माण झाला होता. त्यामुळे नागरिकांची उक्द्यातून काही अंशी सुटका झाली होती. तर, सकाळी ११.०० ते ११.३० वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला रिमझिम पडणाऱ्या पावसाच्या काही मिनिटातच ढगांच्या कडकडाटासह मुसळधार बरसणे सुरु केले. अचानकपणे पावसाला सुरुवात झाल्याने बाजारात खरेदीसाठी आलेल्या व कामावर जात असलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती.
मागील अनेक दिवसापासून पाऊस गायब झाल्याने कपाटात व माळ्यावर ठेवलेल्या छत्र्या पुन्हा काढण्याची वेळ ओढवली, त्यात ठाणे शहरात शुकारावरी १२.३० ते २.३० या तीन तासाच्या कालावधीत १६.५७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. तीन तासात कोसळलेल्या पावसामुळे शहरातील श्रीनगर वागळे इस्टेट भागातील नाला ओव्हर फ्लो झाल्याने देवरथी बंगल्याच्या आवारात पाणी साचल्याची घटना घडली. त्याचबरोबर विजय गार्डन कावेसर येथे सद्गुरू गार्डनच्या आवारात पाणी साचले होते. तसेच अष्टविनायक चौका येथे झाडाची फांदी पडल्याची घटना घडली असल्याची नोंद पालिकेच्या पट्टी व्यवस्थापन कक्षाकडे करण्यात आली.