शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

महामार्गांवरील कोंडी थांबवण्यासाठी अवजड वाहनांना ठेवणार वेटिंगवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 12:20 AM

ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांतील रस्त्यांची पावसामुळे दुरवस्था झाली आहे.

ठाणे : ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांतील रस्त्यांची पावसामुळे दुरवस्था झाली आहे. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. नवरात्रोत्सवापूर्वी जिल्ह्यातील खड्डे भरण्याची तंबी सार्वजनिक बांधकाम व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी संबंधित यंत्रणांना दिली. याशिवाय, महामार्गांवर होणारी वाहतूककोंडी दूर करण्यासाठी अवजड वाहने ठिकठिकाणी थांबवून ती काही वेळेनंतर टप्प्याटप्प्याने सोडण्याचे आदेशही त्यांनी वाहतूक नियंत्रण विभागास दिले.येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात गुरुवारी शिंदे यांनी रस्त्यांची दुरवस्था आणि वाहतूककोंडी या विषयावर खास बैठक घेतली. रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी आणि वाहतूककोंडी दूर करण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. नवरात्रोत्सव सुरू होण्याआधी खड्डे न भरल्यास संबंधितांवर निलंबनाची कारवाई करण्याचे संकेतही शिंदे यांनी यावेळी दिले. त्यामुळे अधिकाऱ्यांना खड्डे भरण्याची कारवाई युद्धपातळीवर करावी लागणार आहे. वाहतूककोंडी दूर करण्यासाठी जेएनपीटीकडून येणारी अजवड वाहने त्यांच्याकडे असलेल्या भूखंडावर रोखायची. त्यानंतर, ती टप्प्याटप्प्याने सोडायची. यामुळे घोडबंदर रोडसह अन्य रस्त्यांवर या वाहनांमुळे वाहतूककोंडी होणार नसल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.पालघरकडून घोडबंदर, अहमदाबाद महामार्गाने येणाºया अजवड वाहनांना रोखण्यासाठी व नाशिक महामार्गावरील अवजड वाहनांना रोखण्यासाठी मोठ्या भूखंडांचा तत्काळ शोध घेण्याचे आदेशही त्यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना दिले. या भूखंडांवर ही अवजड वाहने थांबवण्यात यावी. त्यानंतर, ती टप्प्याटप्प्याने महामार्गांवर सोडावी, असे निर्देश शिंदे यांनी वाहतूक नियंत्रण विभागास दिले. यासाठी पडघ्याजवळ किंवा शहापूर, मुरबाड परिसरात भूखंड शोधण्याचे निर्देशही त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीए, एमएसआरडीसी, जेएनपीटी, महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा प्रशासन आदी यंत्रणांनी समन्वय साधून वाहतूककोंडीवर एकत्रितपणे उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी सांगितले.याबरोबरच वाहतूककोंडी टाळण्यासाठी अवजड वाहनांसंदर्भात वाहतूक विभागाने काढलेल्या अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश शिंदे यांनी दिले. या बैठकीस पालघर, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, आमदार संजय केळकर, शांताराम मोरे, बाळाराम पाटील, बालाजी किणीकर, सुभाष भोईर, ज्योती कलानी, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, रायगड जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी, पालघर जिल्हाधिकारी कैलास शिंदे आदींसह संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.ठाणे शहरामध्ये येणाºया आणि बाहेर जाणाºया रस्त्यांवर होणाºया वाहतूककोंडीची कारणे आणि त्यावर संबंधित यंत्रणेकडून करण्यात येणाºया उपाययोजनांचा यावेळी शिंदे आणि चव्हाण यांनी आढावा घेत यंत्रणांना धारेवर धरले. ठाणे वाहतूक विभागाने काढलेल्या अधिसूचनेची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, यासाठी जेएनपीटीमध्ये असलेल्या वाहनतळाचा तत्काळ वापर सुरू करण्यात यावा, रायगडच्या जिल्हाधिकाºयांनी यामध्ये लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचना शिंदे यांनी केल्या. सिडकोकडे असलेली वाहनतळे तत्काळ हस्तांतरित करण्यात यावीत. पालघरच्या जिल्हाधिकाºयांनी पालघरमधील दापचेरी, मनोर, चारोटीनाका येथील जागांची उपलब्धता वाहनतळांसाठी करून द्यावी, असेही त्यांनी यावेळी सूचित केले. ठाणे ग्रामीण भागातील शहापूर, पडघ्याचा वापर करावा. या वाहनतळाच्या ठिकाणी ट्रॅफिक वॉर्डन, फलक तसेच बॅरिकेड्स लावण्यासाठी आवश्यक असलेला निधी जिल्हा वार्षिक योजनेमधून उपलब्ध करून देण्यात येईल, असेही शिंदे यांनी सांगितले. ठाणे, पालघरसह रायगड जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात खड्डे झाले आहेत. या खड्ड्यांमुळे अनेकांचे बळीदेखील गेले आहेत. याची गांभीर्याने दखल घेत चव्हाण यांनी खड्ड्यांबाबत अधिकाºयांना फैलावर घेतले. ठाणे जिल्ह्यासह पालघर व रायगड जिल्ह्यांत पावसामुळे पडलेले खड्डे आणि वाहतूककोंडीमुळे रुग्णवाहिकांनाही फटका बसत असून, रुग्णांना प्राण गमवावे लागल्याच्या मुद्द्यावर या वेळी चर्चा झाली. ठाणे महापालिकेच्या अधिकाºयांनी पालिका क्षेत्रातील खड्ड्यांची माहिती या वेळी दिली.।पथकर मार्गावरील खड्डे प्राधान्याने भरण्याबाबत संबंधित संस्थांना चव्हाण यांनी आदेश दिले. खड्डे तत्काळ न भरल्यास पथकर बंद करण्याचा इशाराही त्यांनी दिला. शीळफाटा, कळंबोलीनाका, पनवेल-उरण रस्ता, मुंब्रा बायपास आदी ठिकाणी होणाºया वाहतूककोंडीवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.कोपरी पूल, पत्रीपूल कामाच्या सद्यस्थितीचा आढावा त्यांनी घेतला. या पुलांच्या कामाबाबत नागरिकांना माहिती देणारा फलक लावावा, अशा सूचनाही त्यांनी संबंधित यंत्रणेला केल्या. यावेळी वाहतूककोंडीवरील उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाली. अवजड वाहनांना करण्यात आलेल्या प्रवेशबंदीचे काटेकोर पालन झालेच पाहिजे, असे निर्देशही त्यांनी पोलिसांना दिले.