शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
3
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
5
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
6
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
7
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
8
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
9
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
10
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
12
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
13
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
14
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
15
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
16
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
18
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
19
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
20
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट

विटावा सबवेच्या रस्त्यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी पालिका घेणार आयआयटी आणि सिमेंट कंपन्यांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 3:34 PM

विटावा सबवेखालील रस्त्यावर पडलेल्या खड्यांच्याबाबत तोडगा काढण्यासाठी पालिका आता आयआयटी आणि सिमेंट कंपन्यांची मदत घेणार आहे. त्यानुसार येत्या आठवडाभरात यावर अंतिम तोडगा काढण्याची रुपरेषा ठरविली जाणार आहे.

ठळक मुद्देपाणी कुठुन येते शोध लागेनापेव्हर ब्लॉक हा केवळ एक प्रयोग होता, पालिकेचे स्पष्टीकरण

ठाणे - दुरु स्तीसाठी मागील चार दिवसापासून बंद असलेला विटावा सब वे मंगळवारी सकाळी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मात्र हा सबवे खुला होताच बसवण्यात आलेले पेव्हर ब्लॉक उखडले गेल्याने अनेक तर्कविर्तक लावले जात आहेत. परंतु हा केवळ तात्पुरता प्रयोग करण्यात आल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. यावर अंतिम सोल्युशन काय करता येऊ शकते, यासाठी आयआयटी आणि सिमेंट कंपन्यांची मदत घेतली जाणार आहे. त्यांच्याकडून आलेल्या अहवालानंतरच पुढील दिशा ठरविली जाईल असेही पालिकेने स्पष्ट केले. परंतु याठिकाणी पाणी मुरतेय कुठून याचाही अभ्यास केला जाणार आहे.चार दिवसाचा ब्लॉक घेऊन विटावा सबवेची दुरु स्ती करण्यात आली. मात्र सिमेंट काँक्र ीटीकरण न करता या ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसवण्यात आले आहेत. यासाठी वाहतूक पोलिसांनी अधिसूचना काढत हा मार्ग चार दिवसांसाठी बंद करून दुरु स्तीचे काम पालिकेमार्फत सुरु होते. या ठिकाणी पाणी साचत असल्याने या सबवेमध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे होतात. कायम अवजड आणि लहान मोठ्या वाहनांची वाहतूक या ठिकाणी सुरूच राहत असल्यामुळे या ठिकाणी दुरु स्ती साठी रस्ता बंद करण्याशिवाय पर्याय नव्हता. हे काम महानगर पालिकेने सुरु केले आणि मंगळवारी काम संपवून सबवे सकाळी सहा वाजता वाहतुकीसाठी सुरु केला. मात्र काही वेळेतच पेव्हरब्लॉक उखडले गेले, आणि हा रस्ता वाहतुकीसाठी पुन्हा बंद करण्यात आला. सध्या येथील वाहतुक सुरु असली तरी यावर आता अंतिम सोल्युशन काढण्याचा प्रयत्न पालिकेमार्फत सुरु झाला आहे. प्रायोगिक तत्वावर येथे पेव्हर ब्लॉक लावण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली.दरम्यान आता यावर अंतिम सोल्युशन काढण्यासाठी आयआयटीची मदत घेतली जाणार आहे. तसेच सिमेंट कंपन्यांना देखील बोलविण्यात येऊन या भागाची पाहणी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. आयआयटीचा सर्व्हे आणि सिमेंट कंपन्या या ठिकाणी कोणता पर्याय योग्य ठरु शकतो, याची सांगड घालून पुढील दिशा ठरविली जाणार असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले. परंतु याठिकाणी पाणी कुठुन साचते हा मोठा प्रश्न पालिकेला सतावत आहे. पूर्वी पावसाळ्याच्या काळातच पाणी साचत होते. परंतु आता १२ महिने या ठिकाणी पाणी साचत असल्याने ते कुठुन येते याची माहिती पालिकेला अद्याप झालेली नाही.

  • या बाबत भाजपाचे गटनेते मिलिंद पाटणकर यांनी काही प्रश्न पालिकेला उपस्थित केले असून त्याची उत्तरे आता पालिका देणार का? असा सवालही त्यांनी केला आहे. पुलाच्या आसपास पाण्याचे झरे आहेत हि बाब पालिकेला व सल्लागारांना माहिती नव्हती का ?, पेव्हरब्लॉक बसविण्याचा सल्ला कोणत्या महान सल्लागारांनी दिला आणि या चुकीच्या सल्ल्याबद्दल त्यांना दिलेली फी परत घेण्यात येईल काय किंवा फी दिली नसल्यास देणार नाही अशी खात्री ठाणेकरांना मिळेल काय?, ज्या ठेकेदाराने काम केले ते निविदा काढून नियमाप्रमाणे देण्यात आले होते का, निविदा काढून काम झाले असल्यास निविदेतील अटी व शर्ती, पेव्हरब्लॉक च्या खाली जरूर असलेले सोलींग, ६ इंच पीसीसी, पेव्हरब्लॉक च्या खाली पावडर ( ग्रीट ) चा थर आवश्यक तेवढ्याच जाडीचा होता का, पेव्हरब्लॉक ची स्ट्रेन्थ किती ठरविण्यात आली होती, सल्लागारांनी हि सर्व स्पेफीकेशन दिली होती का कि फक्त पेव्हर ब्लॉक लावण्याचा सल्ला दिला होता यासह आणखी काही सवाल उपस्थित केले असून याची उत्तर पालिकेने द्यावीत अशी मागणी केली आहे.

 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त