ठाणे : शहापूर तालुक्यातील बेहलाेंडे ग्राम पंचायतींच्या कार्यक्षेत्रातील सापटेपाडा येथील घर आठ दिवसांपूर्वी पडल्याची दुर्घटना घडली हाेती. या दुर्घटनेनंतर उपचारादरम्यान जानी लाडक पाचलकर या महिलेचा मृत्यू झाला. त्यास अनुसरून शासनाने चार लाखांच्या आर्थिक मदतीचा धनादेश या महिलेचे वारस चिरंजीव बबन पाचलकर यांच्याकडे आज सुपुर्द करण्यात आल्याचे या मदतीसाठी पाठपुरावा करणारे श्रमजीवी संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रकाश खाेडका यांनी स्पष्ट केले.
पावसादरम्यान बेहलोंडे ग्राम पंचायतीच्या हद्दीतील सापटेपाडा येथे घर पडून सहा जण गंभीर जखमी झाले हाेते. त्यातील जानी पाचलकर या गृहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या मृताची गंभीर दखल घेऊन शासनाने या महिलेच्या वारस मुलाकडे चार लाखांचा धनादेश देऊन या पाचलकर परिवाराची आर्थीक मदत केली आहे. सततच्या पावसामुळे राहते घर ११ जुलैराेजी पडून गंभीर जखमी झालेल्या या महिलेला शहापूरला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. या उपचारा दरम्यान दिनांक १५जुलै रोजी तीचा मृत्यू झाला असून त्यावावतची शासकीय मदत कायदेशीर वारस म्हणून बबन पाचलकर या त्यांच्या मुलाकडे शहापूर तहसिलदार कार्यालयाने आज सुपुर्द केली. त्यापाेटी धनादेश क्र.८४७०८७ हा रक्कम रुपये चार लाख रूपयांचा धनादेश येथील गांवातील पंचाच्या समक्ष आज देण्यात आलेला आहे. धनादेश देताना शहापूरचे निवासी नायब तहसिलदार वसंत चौधरी, सावराेलीचे तलाठी वासुदेव पाटील, बेहलाेंडचे उपसरपंच जितेश विशे, ग्राम पंचायत सदस्य जानु जाधव, प्रमिला जाधव आदी उपस्थित हाते.