शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

रवी पुजारीची वसुलीसाठी मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 5:35 AM

क्रिकेटवर सट्टा खेळणाऱ्यांकडून पैसे वसूल करण्यासाठी कुख्यात गँगस्टर रवी पुजारीची आपण वेळोवेळी मदत घेतल्याची कबुली, या प्रकरणातील आरोपी सोनू जालानने पोलिसांना दिली आहे

ठाणे : क्रिकेटवर सट्टा खेळणाऱ्यांकडून पैसे वसूल करण्यासाठी कुख्यात गँगस्टर रवी पुजारीची आपण वेळोवेळी मदत घेतल्याची कबुली, या प्रकरणातील आरोपी सोनू जालानने पोलिसांना दिली आहे. ही माहिती पोलिसांकडून पडताळली जात आहे.क्रिकेटवर मोठ्या प्रमाणात सट्टा खेळणाºया आठ आरोपींना ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली होती. मालाड येथील आंतरराष्ट्रीय बुकी सोनू जालान यालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. कुख्यात गँगस्टर रवी पुजारी टोळी सहभागी असल्याचे उघड झाल्याने, पोलिसांनी या प्रकरणात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वयेदेखील (मकोका) गुन्हे दाखल केले होते. मकोकांतर्गत १९ जून रोजी विशेष मकोका न्यायालयाने सोनू जालानला २६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने, मंगळवारी त्याला पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. या वेळी सहायक पोलीस आयुक्त एन. टी. कदम आणि खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांनी न्यायालयासमोर बाजू मांडली.मकोकाच्या कलम १८ अंतर्गत पोलिसांनी सोनू जालानचा कबुलीजबाब नोंदविला होता. सोनूकडे बरेचसे ग्राहक नियमित सट्टा लावायचे. या ग्राहकांमध्ये बॉलीवूडमधील अनेक नामांकित व्यक्तिंचाही सहभाग समोर आला आहे. सोनू त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा रक्कम वसूल करायचा. अभिनेता अरबाज खानवर त्याने अशाच प्रकारे १.७५ कोटी रुपयांची वसुली काढली होती. त्या वेळी अरबाजसोबत सोनूचा वादही झाला होता. कालांतराने त्यांच्यातील वाद संपुष्टात आला. मात्र, काही प्रकरणांमध्ये सोनूने सांगितलेली रक्कम देण्यास ग्राहकांनी नकार दिला. त्यांच्याकडून रक्कम वसूल करण्यासाठी कुख्यात गँगस्टर रवी पुजारीची मदत घेतल्याचे सोनूने कबुलीजबाबामध्ये सांगितले. त्याने दिलेली माहिती पडताळण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.