कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेचे माजी महापौर आणि शिवसेनेचे कल्याण उपजिल्हा प्रमुख पुंडलिक म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी २ हजार गरजूंना अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात आले. शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांच्या हस्ते हे वाटप केले गेले.
लॉकडाऊनमुळे सामान्य माणूस आर्थिक विवंचनेत आहे. त्यामुळे यावर्षी पुंडलिक म्हात्रे यांनी वाढदिवस साजरा न करता त्याऐवजी गरजूंना मदत दिली. त्यांनी त्यांच्या समर्थकांना वाढदिवसानिमित्त कोणीही पुष्पगुच्छ, शाल आणू नये असे आवाहन केले होते. लॉकडाऊनमध्ये पुंडलिक म्हात्रे यांनी सलग ३१ दिवस अन्नछत्र सुरू ठेवले होते. या ३१ दिवसांत ३० हजार गरजूंनी या अन्नछत्राचा लाभ घेतला. ज्यांच्या हाताला लॉकडाऊनमध्ये काम नाही, त्यांच्यासाठी अन्नधान्याच्या किट आणि ३१ दिवसांचे अन्नछत्र हा मोठा आधार ठरल्याची माहिती दीपेश म्हात्रे यांनी दिली आहे.
-----------