भिवंडी : भिवंडी महापालिकेत सफाई कामगार पदावर रुजू झालेले काहीजण अधिकाऱ्यांच्या रिक्त पदावर बसून काम करीत असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. शहरातील विविध नागरी समस्या भीषण स्वरुप धारण करण्याची जी वेगवेगळी कारणे आहेत त्यामध्ये एक कारण हेही असल्याचे मानले जात आहे.महापालिका स्थापन झाल्यापासून शासनाने पालिकेस सक्षम अधिकारी देण्यात कुचराई केल्याने व पालिका आस्थापनात प्रभारी अधिकाºयांची वर्णी लावली गेली आहे. शहरातील काही नागरिकांनी पालिकेतील महत्त्वाच्या पदांवर शासकीय अधिकाºयांची नेमणूक करावी, अशी मागणी केली आहे.महापालिका स्थापन झाल्यापासून गेल्या १६ वर्षात १४ आयुक्त झाले. त्यापैकी ३ आयएएस दर्जाचे अधिकारी होते. शासन धोरणानुसार पालिकेत प्रशासकीय स्तरावर पाच उपायुक्त व पाच प्रभाग अधिकारी शासनाने नेमणूक करणे अपेक्षित आहे. तसेच शहर अभियंता, वीज अभियांत्रिक अभियंता, पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता हे अधिकारी शासनाने नियुक्त केलेले नाहीत. पालिकेत सफाई कामगार म्हणून पालिकेत रूजू झालेले कर्मचारी या पदावर बढती घेऊन अधिकारी बनले आहेत. महापालिका क्षेत्राचा विकास व्हावा आणि कर्मचाºयांमध्ये शिस्त यावी याकरिता तत्कालीन आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी अधिकाºयांची नेमणूक व्हावी, याकरिता पत्रव्यवहार केला होता. मात्र शासनाने अद्याप निर्णय घेतलेला नाही. परिणामी पात्रता नसतानाही काही कर्मचारी अधिकारीपदावर बसले आहेत. काही विभाग अधिकाºयांखेरीज राहिले तर कामच होणार नाही हे लक्षात आल्याने वेळोवेळी नियुक्त्या केल्या आहेत.शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकारी प्रदीप भोसले यांची सहा महिन्यांपूर्वी महापालिकेत शहर अभियंता म्हणून नियुक्ती केली. मात्र पालिका प्रशासनाने भोसले यांच्याकडे शहर अभियंता पदाचा कार्यभार न सोपविल्याने बांधकाम विभागात सध्या सावळागोंधळ सुरू आहे. पालिकेतील या सावळ््यागोंधळावर नगरसेवक व विरोधी पक्षनेता बोलत नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सफाई कामगारांकडे उच्च पदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 1:54 AM