शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा फॉर्म्युला १००-८०-८०...; दोन दिवसांत तोडगा काढून जागावाटप जाहीर करणार, 'या' एका गोष्टीवर एकमत नाही!
2
राष्ट्रवादीच्या आमदारांसमोर पेच; तिकिटासाठी कोणता झेंडा हाती? आधी करतायत चाचपणी 
3
आजचे राशीभविष्य: ५ राशींना धनलाभ, प्रमोशन, पगारवाढ योग; चैतन्य, उत्साहाचा दिवस
4
भाजपचे १०५ उमेदवार ठरले; काही विद्यमान आमदारांना मिळणार डच्चू!
5
कलम ३७० रद्दचा निर्णय कायम ठेवणारे न्या. संजीव खन्ना होणार सरन्यायाधीश; ५१वे सरन्यायाधीश म्हणून ६ महिने राहणार पदाव
6
मुलासमोर लैंगिक संबंध, नग्न होणे लैंगिक छळच; पोक्सो कायद्यानुसार गुन्हा - केरळ हायकोर्ट
7
रेल्वे प्रवासाचे आरक्षण आता १२० नव्हे, ६० दिवस आधी करा 
8
कॅनडाचे पंतप्रधान ट्रूडो तोंडघशी; ठोस पुरावे नव्हते
9
न्या. संजीव खन्ना नवे सरन्यायाधीश! सरन्यायाधीश चंद्रचूड यांची शिफारस, ११ रोजी शपशविधी
10
भाजपाचा नेता ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश; सावंतवाडीत दीपक केसरकरांची चिंता वाढली?
11
IAS अधिकारी रानू साहू यांना अटक, 540 कोटींचा DMF घोटाळा काय?
12
15 विधानसभा उमेदवारांची नावे असलेली यादी व्हायरल; काँग्रेसने सांगितलं सत्य काय?
13
इस्रायलच्या हल्ल्यात हमास प्रमुख याह्या सिनवार ठार; 3 महिन्यांत 3 मोठे शत्रू संपवले
14
Women's T20 World Cup: ऑस्ट्रेलियाचा खेळ खल्लास; दक्षिण आफ्रिकेनं दिमाखात गाठली फायनल
15
Mahayuti: "रामटेकमध्ये जयस्वाल नकोच, महायुतीने दुसरा उमेदवार द्यावा"
16
आज माझं कुटुंब कोसळलं आहे, पण...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर मुलगा झिशान सिद्दिकींनी काय आवाहन केलं?
17
'जुन्या गोष्टी विसरुन भविष्याकडे वाटचाल करा', भारत-पाक संबंधांवर नवाझ शरीफ स्पष्ट बोलले
18
"वरोराची जागा भाजपलाच हवी, अन्यथा...", पक्षाला इशारा, इच्छुक धडकले कार्यालयात
19
सरकारनं खेळाडूंची बक्षिसं दिली नाहीत, विश्वविजेत्या संघातील काहींशी चर्चा झाली; आव्हाडांचा दावा
20
"तुमच्यात धमक असेल, तर..."; प्रवीण दरेकरांचं मनोज जरांगेंना खुलं आव्हान

उलगडणार ऐतिहासिक नाण्यांचा इतिहास

By admin | Published: March 18, 2017 3:45 AM

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून ऐतिहासिक नाण्यांचे ५५ वे प्रदर्शन ठाणेकरांच्या भेटीला येत आहे. यात शिवकालीन व शिवपूर्वकालीन नाणी व मुद्रा

ठाणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून ऐतिहासिक नाण्यांचे ५५ वे प्रदर्शन ठाणेकरांच्या भेटीला येत आहे. यात शिवकालीन व शिवपूर्वकालीन नाणी व मुद्रा पाहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे त्या नाण्यांची राजकीय व ऐतिहासिक माहितीदेखील सादर केली जाणार आहे.ठाणे पूर्वमधील पारशीवाडीतील ‘शिवदुर्ग ग्रुप’ हा तरु णांचा समूह गेली काही वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेजस्वी इतिहासातून प्रेरणा घेऊन गडकोटसंवर्धन, किल्ले स्पर्धेत सहभाग, दुर्गभ्रमण अशा उपक्र मांतून तो इतिहास अभ्यासण्याचा, जपण्याचा व इतर तरु णांनाही त्याचे महत्त्व समजून देण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून तरु णांना इतिहासाजवळ नेऊन त्याच्याबद्दल आस्था निर्माण करण्यासाठी हे प्रदर्शन भरवण्यात येत आहे, असे आयोजकांनी सांगितले. हे प्रदर्शन शनिवार, १८ मार्च रोजी वसंत पाटील चाळ, पारशीवाडी, कोपरी कॉलनी, कोपरी पोलीस स्टेशनजवळ, ठाणे (पू.) येथे आयोजित केले असून नाणीसंग्राहक प्रशांत ठोसर यांच्या संग्रहातील नाणी यात पाहायला मिळणार आहेत. यात शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकानंतरच्या काळातील छत्रपती राजाराम महाराज यांच्या कारकिर्दीतील चलनात असलेली होण (सुवर्णमुद्रा), शिवराई (ताम्रमुद्रा) अशा प्रकारची दुर्मीळ व आकर्षक नाणी या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण असणार आहे. संभाजी महाराजांच्या काळातील दुर्मीळ नाणीसुद्धा प्रदर्शनात पाहायला मिळतील. २००५ साली मुलुंड येथे पहिले ऐतिहासिक नाण्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. ठाणेकरांनी मोठ्या संख्येने या प्रदर्शनास भेट द्यावी आणि इतिहासाशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे. (प्रतिनिधी)