भिवंडी : दापोडा गावात प्लास्टिक दाण्यापासून मोती बनविण्याच्या कारखान्याला रविवारी लागलेल्या भीषण आगीत होरपळून चौघांना मृत्यू झाल्याच्या घटनेला चोवीस तास उलटूनही पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने नातवाईंकांनी आक्रोश केला आणि मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली. नारपोली पोलीस ठाण्याबाहेर सोमवारी सकाळी मृतांच्या नातेवाईकांनी गर्दी करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने वातावरण तापले. अखेर पोलिसांनी समजूत काढल्यावर रात्री आठनंतर हे मृतदेह ताब्यात घेण्यात आले. दापोडा गावात जळालेला हा मोती कारखाना अवैधरित्या सुरू होता. जवळच माणकोली नाक्यावर रहाणाऱ्या वडार समाजातील महिला या कारखान्यात प्लास्टिकच्या मण्यांना रंग लावण्याचे काम करत. तेथे अचानक रसायनाचा वास येऊ लागल्याने सुरेखा मिरेकर यांना उलटी झाली. तोवर रसायनाच्या ड्रमला आग लागल्याने व्यवस्थापकाने तिला जाळीच्या दरवाज्यावर चढवत बाहेर जाण्यास सांगितले. तोवर इतर कामगारही बाहेर पळाले. मात्र मशीनवर काम करणाऱ्या कामगारांना बाहेर पडता न आल्याने त्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. त्यातील मनोज यादव (२०) हा उत्तर भारतीय होता. सारिका दासरी (४५), निर्मला जादुगर-जाधव (३५), अनुराधा निंबोले (२७) या महिला वडार समाजाच्या होत्या. (प्रतिनिधी)रसायनाच्या ड्रमला आग लागल्याने व्यवस्थापकाने तिला जाळीच्या दरवाज्यावर चढवत बाहेर जाण्यास सांगितले. तोवर इतर कामगारही बाहेर पळाले. मात्र काही कामगारांना बाहेर पडता न आल्याने त्यांचा मृत्यू झाला.
होरपळलेल्या कामगारांचे मृतदेह ताब्यात
By admin | Published: February 21, 2017 3:58 AM