उल्हासनगर: शहरातील ऑनलाईन जुगार, लॉटरी, खुले आम गुटखा, गांजा, चरस विकणे, क्रिकेट सट्टा, हुक्का पार्लर आदी अनधिकृत धंदे चालू असून या अनधिकृत धंद्यावर कार्यवाई करण्याची मागणी आमदार कुमार आयलानी यांनी शासनाकडे केली होती. अखेर शासनाने दाखल घेऊन पोलीस महासंचालकांना कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती आमदार आयलानी यांनी दिली आहे.
उल्हासनगरात ऑनलाईन जुगार, अवैध धंदे, मटका।जुगार आदी अनैतिक धंद्यामुळे गुन्हेगारीत वाढ झाल्याची ओरड शहरात सुरू झाली. अखेर आमदार कुमार आयलानी यांनी दखल घेऊन शासनाकडे याबाबत लेखी निवेदन देऊन कारवाईची मागणी केली. तसेच गेल्या हिवाळी अधिवेशन राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शहरात सुरू असलेल्या अनैतिक धंद्याची माहिती दिली होती. गृहविभागाने पोलिस महासंचालकांनी याबाबत तातडीने कार्यवाई करण्याचे निर्देश दिले असून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास तत्काळ सादर करावा. असे निर्देश राज्य गृहविभागाने पोलिस विभागाला दिले आहेत. अशी माहिती आमदार आयलानी यांनी दिली आहे.