ठाणे : आम्हाला महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याची कोणतीही घाई नाही, हे सरकार आम्ही कधीही पाडणार नाही, महाविकास आघाडीचे सरकार हे अंतर्गत वादातूनच पडेल, असा दावा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीवस यांनी केला. आम्हाला सरकार पाडण्यापेक्षा राज्यातील 12 कोटी जनतेचे प्रश्न महत्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले. परंतु कोवीड पासून जनतेचे दुर्लक्ष करण्यासाठी राऊत हे असे काही तरी लिखाण करतात, आणि मुख्य मुद्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
सोमवारी फडणवीस यांनी ठाण्यातील भाईंदर पाडा येथील क्वॉरन्टाइन सेंटर व कोवीड केअर सेंटरला भेट दिली. त्यानंतर त्यांनी महापालिका मुख्यालयात आयुक्तांबरोबर कोरोना बाबात करण्यात येत असलेल्या उपाय योजनांबाबत चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी हा आरोप केला आहे. राज्याच्या दृष्टीकोणातून एखादा विषय महत्वाचा असेल, सरकाराचे अपयश झाकायचे असेल तेव्हा असा कपोलकल्पीत लेख लिहून विरोधक सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे लिहितात. परंतु आम्हाला सरकार पाडण्याची घाई नाही, 12 आमदार आहेत, सरकार पाडणार असे काही नाही. या उलट आम्हाला राज्यातील 12 कोटी जनतेचे प्रश्न महत्वाचे असल्याचे सांगितले.
पोलिसांच्या बदलीच्या बाबत समन्वय नसल्याचे दिसून आले आहे. वास्तविक पाहता पोलिसांच्या अंतर्गत बदल्या करीत असतांना सीपी हे गृहमंत्र्यांशी चर्चा करतात, त्यानंतर गृहमंत्र्यांनी याची माहिती मुख्यमंत्र्यांना द्यायची असते. परंतु असे काही झालेलेच दिसत नसल्याचे त्यांनी सांगितले. एकूणच समन्वयाच्या अभावामुळे किंवा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे वेगळे असल्याने यातूनच असा प्रकार घडला असेल असेही त्यांनी सांगितले.
केंद्राकडून कोवीड साठी 9क् हजार कोटींचा आरएसीच्या माध्यमातून निधी मंजुर केला आहे, त्यातून राज्य सरकारला 9 हजार कोटी मिळू शकतात. परंतु ते मिळविण्याऐवजी उलट केंद्र सरकारकडेच नितीन राऊत बोट दाखवून केंद्राने काहीच मदत केली नसल्याचा गवगवा करीत आहेत. आतापर्यंत महामारीच्या काळात एवढी मदत झालेली नव्हती. परंतु ती मिळविण्याऐवजी नको त्या विषयांना खतपाणी घातले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
अन्य महत्वाच्या बातम्या...
लढाईला तयार रहा! PUBG चा नवा मॅप येड लावणार; उद्या मोठी अपडेट मिळणार
अशक्यच! 15 ऑगस्टपर्यंत कोरोनावरील लस येणार नाही; सरकारनेच केले स्पष्ट
धक्कादायक! मालकाकडून व्यवस्थापकाचे अपहरण; गुप्तांगामध्ये सॅनिटायझर स्प्रे केले
धक्कादायक! अविरत सेवा देणाऱ्या तब्बल 1302 रेल्वे कर्मचाऱ्यांसह कुटुंबियांना कोरोनाची बाधा
पाकिस्तानकडून 'कोरोना बॉम्ब'; कुलगाममध्ये मारले गेलेले दहशतवादी निघाले पॉझिटिव्ह
शी जिनपिंग यांची खुर्ची धोक्यात? भारतीय जवानांच्या शौर्याची झळ बिजिंगपर्यंत
WHO चा भारताला पुन्हा दणका; कोरोनावरील तीन औषधांवर बंदी लादली