शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

भिवंडीमध्ये घरपट्टी, पाणीपट्टी तीन महिन्यांसाठी केली माफ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 1:05 AM

लॉकडाऊनच्या तीन महिन्यांकरिता घरपट्टी, पाणीपट्टी माफ करण्याची घोषणा महापौर प्रतिभा पाटील यांनी बुधवारी ऑनलाइन महासभेत केली.

भिवंडी : कोरोनामुळे भिवंडीतील नागरिक, व्यापारी, उद्योजक, यंत्रमागधारक यांचे आर्थिक नुकसान झाले असल्याने त्यांना दिलासा देण्याकरिता लॉकडाऊनच्या तीन महिन्यांकरिता घरपट्टी, पाणीपट्टी माफ करण्याची घोषणा महापौर प्रतिभा पाटील यांनी बुधवारी ऑनलाइन महासभेत केली.महासभेच्या विषयपत्रिकेत कोरोना व लॉक डाऊन काळातील तीन महिन्यांचे मालमत्ता कर व पाणीपट्टी माफ करण्याचा विषय प्रस्तावित होता. स्थायी सभापती हलीम अन्सारी यांनी चर्चेला सुरुवात करताना करमाफीची मागणी केली व त्यास सभागृह नेता विलास पाटील यांनी अनुमोदन दिले. महापौर म्हणाल्या की, कोरोनामुळे जाहीर केलेल्या लॉक डाऊनच्या काळात शहरातील व्यापारी, नागरिकांचे फार मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून येणारे नाही. शहरातील नागरिकांना थोडासा आर्थिक दिलासा देण्याकरिता लॉकडाऊनच्या तीन महिन्यांच्या काळातील मालमत्ता व पाणीपट्टी कराची माफी देत आहोत. प्रशासनाने महासभेच्या या निर्णयानुसार योग्य ती कार्यवाही करावी, असे आदेश महापौरांनी दिले. शहरातील नागरिक, सेवाभावी संस्था, मोहल्ला क्लिनिक सुरू करणारे वैद्यकीय व्यावसायिक, महापालिका अधिकारी, कर्मचारी या सर्वांच्या सहकार्यामुळे कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असल्याबद्दल महापौरांनी समाधान व्यक्त केले व सर्वांचे आभार मानले.