ठाणे : चांगले कर्म, निस्वार्थ सेवा आणि प्रामाणिकपणा ही यशस्वी होण्याची त्रिसूत्री आहे. सामाजिक जीवनात काम करतांना प्रामाणिकपणे काम करावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे केले. येथील आर. जे. ठाकुर महाविद्यालयात चंद परिवार फाउंडेशनतर्फे आयोजित केलेल्या पाचव्या वार्षिक समारंभामध्ये राज्यपाल बोलत होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की चंद परिवार फाउंडेशन पाच वर्षे खुप चांगल्या प्रकारे समाजोपयोगी कार्ये करीत आहेत. त्यांनी त्यांचे हे कार्य असेच पुढे चालू ठेवावे. चांगल्या कामाची समाज नेहमी दखल घेत असतो. हिंदी ही राष्ट्रीय भाषा असली तरी महाराष्ट्रात आपण राहतो तर मराठी बोलायला शिकले पाहिजे असेही मार्गदर्शन त्यांनी यावेळी उपस्थिताना केले. यावेळी चंद परिवार फाउंडेशनचे नॅशनल कमिटी अध्यक्ष दिबी चंद, उपाध्यक्ष प्रकाश राजन, महासचिव महेश रजवाल, केंद्रीय कोषागार अध्यक्ष नवीन चंद ठाकुर उपस्थित होते. या चंद परिवार फाउंडेशनतर्फे उत्कृष्ट काम केल्याबदल सुरेश राणाजी, बिरेंद्र नेगी, डॉ. दिनेश चंद आदींना राज्यपालांच्या हस्ते गौरवण्यात आले.
सामाजिक जीवनात काम करतांना प्रामाणिकपणा महत्त्वाचा -राज्यपाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 8:43 PM
ठाणे : चांगले कर्म, निस्वार्थ सेवा आणि प्रामाणिकपणा ही यशस्वी होण्याची त्रिसूत्री आहे. सामाजिक जीवनात काम करतांना प्रामाणिकपणे काम ...
ठळक मुद्देचांगल्या कामाची समाज नेहमी दखल घेत असतो.चंद परिवार फाउंडेशन पाच वर्षे खुप चांगल्या प्रकारे समाजोपयोगी कार्ये यशस्वी होण्याची त्रिसूत्री आहे