ठाणे : अपार मेहनत आणि अत्यंत चिकाटीने कर्तव्य पार करीत सुमारे चार वर्षात ५३ कोटी ५८ लाख रूपयांच्या गुतंवणूक करीत त्यावरील व्याजाची मोठी रक्कम ठाणेजिल्हा परिषदेला वित्त विभागाच्या कनिष्ट लेखाधिकारी संगीता घुरडे यांनी मिळवून दिली. त्यांच्या या उत्कृष्ट कामांची दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी घुरडे यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.कर्मचारी हा जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा मुख्य पाया असून अशा कर्मचाऱ्याना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा योग्य वेळी यथोचित गौरव होणे गरजे आह,े असे मत मुख्य भीमनवार यांनी व्यक्त करीत उल्लेखनीय कामिगरी बद्दल घुरडे यांना सन्मानित केले. यावेळी ते बोलताना भीमनवार पुढे म्हणाले की जिल्हा परिषदेची प्रतिमा उंचावण्यासाठी कर्मचारी प्रामाणकिपणे काम करत असतो. त्याच्या कामाची दखल घेणे गरजेचे असल्याचे सांगत भीमनवार यांनी उपस्थित सर्व विभाग प्रमुख यांना त्यांच्या विभागात सचोटीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्याना गौरवण्याच्या सूचना केल्या. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रूपाली सातपुते यांच्यासह उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी मयूर हिंगाण, सर्व विभाग प्रमुख , गट विकास अधिकारी आणि इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.जिल्हा परिषद वित्त विभागात घुरडे या कनिष्ट लेखाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी गेल्या चार वर्षात गुंतवणूकीवरील व्याज, घसारा निधी, लेखा/अंदाज शाखेतील लेखा परीक्षण आक्षेप पूर्तता, स्वउत्पन्न अंदाजपत्रकाचे कामकाज, वार्षिक लेखे तयार करणे आदी कामकाजाचे पर्यवेक्षण जलदगतिने पूर्ण करून जिल्हा परिषदेची आर्थिक प्रतिमा उंचावण्यासाठी सातत्याने काम केले आहे. या उत्कृष्ट कामांची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. चार वर्षात ५३ कोटी ५८ लाख गुतंवणुकीवरील व्याज मिळवून दिले आहे. तसेच तब्बल ९३ लाख ५७ हजार घसारा निधी गुतंवणुकीतील व्याज प्राप्त केले. या कामाची दखल घेवून घुरडे यांना प्रमाणपत्र देवून आज गौरवण्यात आले.
५३ कोटींच्या गुतंवणुकीवरील व्याज मिळवून देणाऱ्या ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला लेखा अधिकाऱ्याचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 1:58 PM
कर्मचारी हा जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा मुख्य पाया असून अशा कर्मचाऱ्याना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा योग्य वेळी यथोचित गौरव होणे गरजे आह,े असे मत मुख्य भीमनवार यांनी व्यक्त करीत उल्लेखनीय कामिगरी बद्दल घुरडे यांना सन्मानित केले. यावेळी ते बोलताना भीमनवार पुढे म्हणाले की जिल्हा परिषदेची प्रतिमा उंचावण्यासाठी कर्मचारी प्रामाणकिपणे काम करत असतो. त्याच्या कामाची दखल घेणे गरजेचे असल्याचे सांगत भीमनवार यांनी उपस्थित सर्व विभाग प्रमुख यांना त्यांच्या विभागात सचोटीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्याना गौरवण्याच्या सूचना केल्या.
ठळक मुद्देचार वर्षात ५३ कोटी ५८ लाख गुतंवणुकीवरील व्याज तब्बल ९३ लाख ५७ हजार घसारा निधी गुतंवणुकीतील व्याज सचोटीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्याना गौरवण्याच्या सूचना केल्या