भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेच्या अग्निशमन दलासह पाणीपुरवठा विभागातील १७ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कमला पार्क येथील मुख्यालय परिसरात २५ जानेवारी रोजी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास क्लोरिन वायूची गळती झाली होती. त्यामुळे बाधित झालेल्या सुमारे ५०० लोकांचे प्राण वाचविल्याचे कार्य केल्याबद्दल त्यांचे सोमवारच्या महासभेत महापौर डिंपल मेहता यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
अग्निशमन मुख्यालय परिसरात पाणीपुरवठा विभागाच्या साठवणुक टाकीतील जलशुद्धीकरण करण्यासाठी वापरण्यात येणाय््राा क्लोरिन वायूच्या सुमारे १६५ किलो साठा सिलेंडरमधून २५ जानेवारीला ११.३० वाजताच्या सुमारास अचानक गळती सुरु झाली होती. त्यामुळे आसपासच्या इमारतीतील रहिवाशांना त्याची बाधा होऊन त्रास होण्यास सुरुवात झाली. त्याची माहिती अग्निशमन मुख्यालयातील रात्र पाळीत कर्तव्यावर असलेल्यांसह पाणीपुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचाय््राांना कळविण्यात आली. त्यानुसार अग्निशमन दलाचे प्रभारी मुख्य अधिकारी प्रकाश बोराडे, उप स्थानक अधिकारी जगदिश पाटील, लिडिंग फायरमन रविंद्र पाटील, यंत्रचालक समाधान कोळी, लक्ष्मण भंडारी, फायरमन संजय म्हात्रे, संतोष माशाळ, संतोष पाटील, धनीलाल गावित, रोहित पाटील, कंत्राटी वाहनचालक हर्षल अधिकारी, तुषार भोईर, पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता उत्तम रणदिवे, मेस्त्री विठ्ठल धोंगडे, वॉल्वमन उत्तरामन दोराईराज, सुरक्षा रक्षक निखीलेश तिवारी व स्थानिक रहिवाशी सुहास करुणाकरण यांनी इमारतीतील रहिवाशांना इमारती बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलविले. अग्निशमन दलातील जवानांनी क्लोरिन वायूचा सिलेंडर लगतच्या खाडीत विसर्जित केला. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टळल्याने त्या १७ जणांचा सोमवारच्या महासभेत महापौरांच्या हस्ते सत्कार करुन त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले. तसेच उप स्थानक अधिकारी पाटील यांना शैक्षणिक पात्रतेच्या कारणावरुन पदावरुन कमी केले होते. त्यावर सध्या स्थगिती आदेश असल्याने पाटील यांना त्या पदावर कायम करण्याचा ठराव भाजपाचे रोहिदास पाटील यांनी मांडला असता तो बहुमताने मंजुर करण्यात आला.