शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

भिवंडी महापौरपदासाठी घोडेबाजार, सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी, निवडणूक ५ डिसेंबरला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 1:56 AM

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी काँग्रेस, शिवसेना नगरसेवकांनी बैठका घेऊन जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

भिवंडी : भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी काँग्रेस, शिवसेना नगरसेवकांनी बैठका घेऊन जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या निवडणुकीत मोठा घोडेबाजार सुरू झाला असून, सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या नगरसेवकांमध्ये फूट पडण्याची चिन्हे आहेत. निवडणुकीमुळे नगरसेवकांमध्ये आपापसात तंटे होत असून, फोडाफोडीच्या राजकारणात एका नगरसेवकाच्या मताला २० ते २५ लाख रुपयांचा भाव दिला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.भिवंडी महापालिकेत शिवसेना, काँग्रेस आघाडीची सत्ता आहे. महापालिकेत ९० नगरसेवक असून त्यामध्ये काँग्रेस ४७, शिवसेना १२, भाजप १९, कोणार्कविकास आघाडी ४, समाजवादी पक्ष २, आरपीआय (एकतावादी) ४, अपक्ष २ असे पक्षीय बलाबल आहे. महापौर जावेद दळवी यांच्या पदाची मुदत ९ डिसेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे शासन निर्देशानुसार महापौरपदासाठी ५ डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. मुंबई उपनगराचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक होणार आहे. ३० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रि या सुरु होणार असल्याची माहिती नगरसचिव अनिल प्रधान यांनी दिली. वरिष्ठांच्या सूचनेनुसार निवडणूक कार्यक्र मात बदल होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.या नगरसेविकांची नावे आहेत चर्चेतमहापौरपद महिलांसाठी आरक्षित झाल्याने काँग्रेसतर्फे वैशाली मनोज म्हात्रे, रिषीका प्रदीप राका, मिसबा खान तर शिवसेनेच्या वतीने गुलाबताई नाईक, वंदना काटेकर, अलका चौधरी, कोणार्क विकास आघाडीतर्फे माजी महापौर प्रतिभा पाटील, भाजपतर्फे अस्मिता चौधरी यांच्या नावाची चर्चा आहे. प्रत्यक्षात महापौरपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.शिवसेनेनेही केला दावामहापालिकेत शिवसेना-काँग्रेस आघाडीची गेल्या अडीच वर्षांपासून सत्ता असून, महापौरपद काँग्रेसकडे तर उपमहापौरपद शिवसेनेकडे आहे. सत्ता स्थापन करताना झालेल्या बोलणीप्रमाणे आता महापौरपद शिवसेनेला मिळावे, यासाठी शिवसेनेच्या नगरसेवकांनी आग्रह धरला आहे. त्यामुळे काँग्रेस व शिवसेना नगरसेवकांमध्ये तंटा निर्माण झाला असून, भिवंडी पालिकेत सेनेचा महापौर बसावा यासाठी नगरसेवकांनी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना साकडे घातले आहे.भाजपच्याही हालचालीभाजपचा महापौर बसविण्यासाठी खासदार कपिल पाटील यांनीदेखील हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र, भाजपच्या नगरसेवकांमध्ये रु सवेफुगवे निर्माण झाल्यामुळे सध्या भाजपमध्ये दोन गट निर्माण झाले आहेत.काँग्रेसमध्ये तीन गट : महापौरपदासाठी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरु आहे. या पक्षात माजी आमदार रशीद ताहीर मोमीन, महापौर जावेद दळवी व ज्येष्ठ नगरसेवक इमरान वली मोहमद खान यांचे तीन गट निर्माण झाले आहेत.

टॅग्स :bhiwandiभिवंडीMayorमहापौरElectionनिवडणूकPoliticsराजकारण